27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषमुंबईत गणपती विसर्जनासाठी २५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबईत गणपती विसर्जनासाठी २५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

संशयित व्यक्ती, वाहने, समान यांची तपासणी सुरु

Google News Follow

Related

मुंबईत गणेशोत्सव निर्विघ्नपणे मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर आता गणपती विसर्जनात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वात सहआयुक्त, अप्पर आयुक्त यांच्यासह जवळपास २५ हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार असा तगडा बंदोबस्त शहरात तैनात राहणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही मोठ्या उत्साहात मुंबईकरांनी सार्वजनिक आणि घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली. दीड दिवस, पाच दिवस, गौरी विसर्जन, सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आता मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी मोठया उत्साहात गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. लालबागच्या राजासह मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे.

मुंबईकरांनी गणेशोत्सव सण सुरक्षित आणि निर्विघ्न साजरा केल्यानंतर आता गणपती विसर्जनासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे. यासाठी ९ सहाय्यक पोलीस आयुक्त ४० पोलीस उपायुक्त, ५६ सहायक पोलीस आयुक्त, ४ हजार १३ पोलीस अधिकारी आणि २० हजार ५१० पोलीस अंमलदार अशा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या दमतीला एस.आर.पी. एफ. प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, तसेच होमगार्डस् तैनात राहणार आहेत.

हे ही वाचा:

कल्पेश दवे आता स्टार हाऊसिंग फायनान्सचे कार्यकारी संचालक

भारताच्या पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन, ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ नावाने ओळख !

गेल्या १०० दिवसांत खूप अपमान झाला, पण ध्येयासाठी मी शांत राहिलो!

कावड यात्रेला विरोध केल्याने हिंदूंनी ईदची मिरवणूकही रोखली !

पोलिसांनी शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करत संशयित व्यक्ती, वाहने, समान यांची तपासणी सुरु केली आहे. शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच, गणपती विसर्जन मिरवणूकांमध्ये महिला आणि मुलांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा