….म्हणून ९९९पादचाऱ्यांनी गमावले प्राण!

….म्हणून ९९९पादचाऱ्यांनी गमावले प्राण!

महापालिकेतर्फे बनविण्यात आलेले पदपथांवर झालेले अतिक्रमण मुंबईत आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. मुख्य म्हणजे पदपथ असूनही, नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघातांनाच आमंत्रण द्यावे लागत आहे. मुंबई ठाण्यातील अनेक पदपथांवर फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण दिसत आहे. त्यामुळेच नागरिकांना आता रस्त्यावर चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच आता रस्ते अपघातही मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत जवळपास १००० पादचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या तीन वर्षात जवळपास रस्ते अपघातामुळे हजार जणांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरातील रस्ते पादचारी वर्गासाठी घातक ठरत आहेत. २०१८ ते २०२० या कालावधीमध्ये मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईतील तब्बल ९९९ जणांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. यापैकी २७७ जण २०२० मध्ये अपघातात ठार झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

हे ही वाचा:
लसीकरण झालेल्यांना रेल्वे खुली करा!

सप्टेंबरमध्ये लहान मुलांनाही कोविड लस मिळणार?

आपत्तीची दरड….

स्टॅन स्वामी आणि न्यायालयाची माघार

महानगरातील बहुतांश पदपथावर अतिक्रमण झालेले दिसते. त्यामुळेच नागरिकांना पदपथाचा वापर करताच येत नाही असे चित्र आहे. त्यामुळे नागरिक बिनदिक्कतपणे रस्त्यावर चालतात. त्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. पदपथ असूनही अनेक पदपथांची उघडी गटारे, पदपथांवरील अतिक्रमण हे मुद्दे भयंकर आहेत.

पदपथांवर वाढता फेरीवाल्यांचा वावर हा आता डोकेदुखी ठरलेला आहे. त्यामुळेच आता पदपथांवरील ही अतिक्रमणे हटवण्यासाठी आता पालिका प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ठाण्यामध्ये २०२० मध्ये ७६ गंभीर अपघातांत ७६ जणांचा मृत्यू झाले आहेत. अपघाताचा धोका हा दिवसागणिक वाढू लागलेला आहे.

पदपथ तयार करून पालिका केवळ अंग काढून घेत आहे. त्यातूनच अनेक पदपथांवर अतिक्रमणे झालेली आहेत. या वाढत्या अतिक्रमांना आळा घालण्याचे काम प्रशासनाकडून होणे खूपच गरजेचे आहे. पालिकेच्या पदपथावरील दुर्लक्षामुळे आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.

Exit mobile version