31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अल्लू अर्जुन, आलिया भट्ट सर्वोत्तम

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अल्लू अर्जुन, आलिया भट्ट सर्वोत्तम

द काश्मीर फाइल्स सर्वोत्कृष्ट, मराठीत ‘एकदा काय झालं’ची निवड

Google News Follow

Related

पुष्पा या चित्रपटातून जगभरातल्या चित्रपटरसिकांना भुरळ घालणारा कलाकार अल्लू अर्जुनला यावेळचा सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पुष्पा या तेलुगु चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी हा पुरस्कार त्याला देण्यात आला आहे. स्त्री भूमिकेसाठी आलिया भट्टला गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कृती सॅननने मिमी या २०२१च्या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे.

 

 

द काश्मीर फाइल्स या देशभरात गाजलेल्या काश्मीरमधील हिंदू पंडितांच्या हत्याकांडावरील चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पुरस्काराने गौरविण्यात आले. यासंदर्भात चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या अनुपम खेर यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, या चित्रपटाचा विचार करण्यात आला त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या अभिनयालाही पुरस्कार मिळाला असता तर मला अधिक आनंद झाला असता. पण सगळ्याच इच्छा पूर्ण झाल्या तर काम करण्यातली मजा तरी काय येणार?

 

 

या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, मी अमेरिकेत आहे. मला पुरस्काराची बातमी कळली भारतातील हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. हा चित्रपट माझा नाही तर सगळ्या काश्मिरींचा आहे, जे दहशतवादाचे बळी ठरले. काश्मीरमधील दहशतवादाला जे बळी पडले त्या सगळ्यांना हा चित्रपट मी अर्पण करतो.

हे ही वाचा:

तेजस विमानातून ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार

कार्लसनने वर्ल्डकप जिंकला, प्रज्ञानंदने जिंकली मने

काय कारण? भारतीय कुस्तीगीरांना जागतिक स्पर्धेत तिरंग्याखाली लढता येणार नाही!

 

आरआरआर या चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून गौरविण्यात आले आहे. गोदावरी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. काश्मीर फाइल्समधील भूमिकेसाठी पल्लवी जोशीला सर्वोत्तम सहकलाकार म्हणून पारितोषिक मिळाले आहे. तर पुरुषांमध्ये सर्वोत्तम सहकलाकाराचे पारितोषिक पंकज त्रिपाठीला मिळाले आहे.

 

 

प्रादेशिक भाषांमध्ये मराठीत ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. मल्याळम भाषेतील होम या चित्रपटाला पुरस्कार मिळाला असून नयाट्टू या चित्रपटाला सर्वोत्तम स्क्रिनप्लेचा पुरस्कार घोषित झाला आहे. दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट म्हणूनही मल्याळम भाषेतील मेप्पादियनला गौरविण्यात आले आहे. त्याला इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला आहे. पर्यावरणावरील उत्कृष्ट चित्रपट म्हणूनही मल्याळम भाषेतील आवासाव्ह्यूहमला गौरविण्यात आले आहे. अखेरच्या फेरीत ३१ चित्रपटांचा विचार करण्यात आला. २८० चित्रपट या पुरस्कारांसाठी पाठविण्यात आले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा