राज्यात आता कोरोनाची दुसरी लाट गेल्यानंतर तिसरी लाट अजून दिसत नाही. त्यामुळेच आता लवकरच शाळा, महाविद्यालये खुली होणार आहेत. मंदिरेही आता लवकरच खुली होतील. शाळा खुल्या झाल्या मग खासगी क्लासेस का सुरु करायचे नाही असा प्रश्न आता खासगी कोचिंग क्लासेसतर्फे विचारण्यात येत आहे.
दुकाने तसेच आस्थापना सुरू ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी शिकवण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. कोचिंग क्लासेस हा एक व्यवसाय असून हा शाळा आणि महाविद्यालयांना समांतर असा व्यवसाय आहे.
शासनाने सर्व नियम पाळून शाळांना परवानगी दिली तशीच परवानगी कोचिंग क्लासेसना देण्यात यावी किंवा तसा अध्यादेश काढावा अशी मागणी कोचिंग क्लासे टीचर्स फेडरेशन अण्ड सोशल फोरम आफ महाराषट्र राज्याचे अध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी केली आहे.
हे ही वाचा:
भायखळा तुरुंगात तब्बल ३९ कैद्यांना झाला कोरोना
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, नद्यांचे महत्त्व ओळखा!
हिंसेला कारणीभूत असलेल्या तृणमूलच्या ममता विश्वशांती संमेलनासाठी का उत्सुक?
हिम्मत असेल तर यावेळी माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, सोमैय्यांचे आव्हान
कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी कोचिंग क्लासेस ( खासगी शिकवण्या) सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मागील एका वर्षापासून सर्व खासगी शिकवण्या बंद आहेत. त्यामुळे आतातरी या शिकवण्या सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आता चांगलीच जोर धरू लागलेली आहे.
मागील काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. रोज हजारो नव्या रुग्णांची नोंद होत होती. तर कित्येक रुग्णांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू होत होता. याच कारणामुळे राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले होते. आता जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झालेले आहेत. त्यात लवकरच शाळाही खुल्या होणार आहेत. मग केवळ खासगी क्लास चालकांवर निर्बंध का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.