राज्यात ठाकरे सरकारने आता एक डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास मुभा द्यावी, अशी मागणी आता वाढू लागली आहे. एकीकडे लसीकरणाचा संथ वेग आणि कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्यामुळे दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या मुळातच कमी आहे. शिवाय, यामध्ये ४५ वरच्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे १८ ते ४४ या सर्वाधिक प्रवास करणाऱ्या गटाला प्रवासाच्या परवानगीचा फायदा फारच कमी होणार आहे. म्हणूनच आता एक डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये प्रवासाची मुभा मिळावी याकरता सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठबोरवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, लस घेणे हे ऐच्छिक असल्याने सरकारचा हा निर्णय राज्यघटनेने दिलेल्या समानतेच्या आणि मूलभूत हक्काचे उल्लंघन करणार आहे.
दुसरीकडे ४५ वरच्या व्यक्तींना देखील दोन डोस पूर्ण होऊन देखील तिकीट न मिळता थेट महिन्याभराचा पास काढावा लागणार आहे. त्यामुळे महिन्यातून फक्त काही दिवस किंवा क्वचित महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या लोकांना देखील दोन डोस पूर्ण होऊनही पूर्ण महिन्याचा पास काढावा लागेल. संथ लसीकरणामुळे अनेक ठिकाणी एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. विशेषत: कल्याणपुढे कर्जत कसारा अशा ग्रामीण भागामध्ये त्यामुळे या ठिकाणी एक डोस घेतलेल्यांना परवानगीची मागणी केली जात आहे.
मुख्य म्हणजे आता अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. त्यामुळेच आता सरसकट सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याची अट घालण्यात आली आहे.
हे ही वाचा:
आमदार देवेंद्र भुयार यांना कारावासाची शिक्षा!
तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा
या अशा नियमावलीमुळे लाखो मुंबईकर आणि आसपासच्या ठिकाणाहून मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी मिळूनही प्रवासापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. एकीकडे लसीकरणाचा संथ वेग आणि कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्यामुळे दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या मुळातच कमी आहे. शिवाय, यामध्ये ४५ वरच्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे १८ ते ४४ या सर्वाधिक प्रवास करणाऱ्या गटाला प्रवासाच्या परवानगीचा फायदा फारच कमी होणार आहे. संथ लसीकरणामुळे अनेक ठिकाणी एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. विशेषत: कल्याणपुढे कर्जत कसारा अशा ग्रामीण भागामध्ये त्यामुळे या ठिकाणी एक डोस घेतलेल्यांना परवानगीची मागणी केली जात आहे.