ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!

खलिस्तानी पुरुषांच्या गटाने जमिनीवरील वस्तू उचलून हिंदू जमावावर फेकल्या

ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!

खलिस्तानी झेंडे हातात घेतलेल्या काही पुरुषांनी जमिनीवरील काही वस्तू फेकून दिवाळी साजरी करणाऱ्या हिंदू जमावावर फेकल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना कॅनडाच्या ब्रॅम्प्टन भागात घडल्याचे सांगितले जात आहे.

टोरोंटो सन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओमध्ये खलिस्तानी झेंडे हातात घेतलेल्या पुरुषांच्या एका गटाने जमिनीवरील काही वस्तू उचलून त्या दिवाळी साजरी करण्यासाठी जमलेल्या हिंदू जमावावर फेकल्या, असे दिसत आहे. त्यानंतर पोलिस जमावाला मागे जाण्यास सांगत असल्याचेही यात दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने ही घटना माल्टन येथील वेस्टवूड मॉल भागात घडल्याचे सांगितले आहे.१२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेची पोलिस चौकशी करत आहेत, असे पील विभागीय पोलिसांनी ‘एक्स’वर स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस

५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!

हिंसाचार भडकवणे, वांशिक अल्पसंख्याक आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करणे आणि द्वेषभावनेतून गुन्हे व भाषणे करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी कॅनडाने त्यांची चौकट बळकट करायला हवी, अशी अपेक्षा भारताने कॅनडाकडे गेल्याच आठवड्यात केली होती. त्यानंतर अशाप्रकारे संघर्षाचा व्हिडीओ समोर आला आहे. जिनिव्हामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांया मानवी हक्क परिषदेला संबोधित करताना भारताचे सचिव के. एस. मोहम्मद हुसैन यांनी या शिफारशी मांडल्या होत्या.

‘रचनात्मक संवादाच्या भावनेने, भारत कॅनडाला खालील शिफारस करत आहे – एक, देशांतर्गत चौकट आणखी मजबूत करणे. हिंसा भडकावण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर रोखणे आणि अतिरेक्यांना प्रोत्साहन देणार्‍या गटांच्या कारवायांना परवानगी न देणे. दोन- धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांवर होणारे हल्ले प्रभावीपणे रोखणे, द्वेषपूर्ण गुन्हे आणि द्वेषपूर्ण भाषणांना संबोधित करण्यासाठी कायदेमंडळ आणि इतर उपायांना बळकटी देणे,” असे मोहम्मद हुसेन यांनी बैठकीत मांडले होते.

Exit mobile version