अयोध्येत होऊ घातलेल्या प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचे जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपतराय यांनी म्हटले आहे. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी राम मंदिर तीर्थ क्षेत्र न्यासावर जमीन खरेदी व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनाच उत्तर देताना चंपत राय यांनी सिंह यांचे नवा न घेता टीका केली आहे. राजकीय द्वेषाने प्रेरित होऊनच काही लोक हे या व्यवहारावरून समाजात संभ्रम पसरवत आहेत.
अखंड भारताचे अराध्यदैवत प्रभू श्रीरामांच्या अयोध्या या जन्मस्थळी त्यांचे भव्य मंदिर उभारले जात आहे. यासाठी न्यायालइन खटला जिंकत राम जन्मभूमीची जागा ही रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला देण्यात आली असून या न्यासामार्फतच मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे. रामजन्मभूमीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार मंदिरासाठी न्यायालयाकडून मिळालेली जागा कमी पडत असल्यामुळे न्यासामार्फत आसपासच्या क्षेत्रातील काही जमीन खरेदी केली जात आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात भाजपाचे राज्यपालांकडे निवेदन
शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचं पाप करू नका
मूकबधिर चोराला बोलतं करण्यासाठी वापरली ही शक्कल
जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष मदत केली होती…
याच जमीन खरेदीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. २ करोडची जमीन न्यासाने १८ कोटीला खरेदी केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपांना राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री यांनी हणून पाडले आहे. त्यांनी या संबंधीचे एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. तर त्यासोबतच ट्विटरवर एक थ्रेडही टाकला आहे.
राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाने खरेदी केलेली जमीन ही ताज्या बाजारभावाने खरेदी केली आहे. तर त्या आधीचा जमीन व्यवहार हा मुळात २०१९ साली झालेला आहे. त्यावेळी राम जन्मभूमी खटल्याचा निकाल लागला नव्हता. त्यामुळे जागांच्या किंमती कमी होत्या. अयोध्येच्या खरल्याचा निकाल लागल्यानंतर अयोध्येतील जागांचे भाव वाढले आहेत. यात कुठलाही घोटाळा नाही असे स्पष्टीकरण राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे देण्यात आले आहे.
विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी न्यासाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला नाही. या आरोपांमुळे समाजात भ्रम निर्माण झाला आहे असा आरोप रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे करण्यात आला आहे. तर देशभरातील रामभक्तानी या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहनही न्यासातर्फे करण्यात आले आहे.
समस्त रामभक्तों से निवेदन है कि वे किसी भी दुष्प्रचार में विश्वास ना करें, ताकि श्री रामजन्मभूमि पर मंदिर निर्माण का कार्य शीघ्र निर्विघ्न रूप से पूरा हो। pic.twitter.com/qPKV9xJ7ky
— Champat Rai (@ChampatRaiVHP) June 14, 2021