बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे सुरक्षा रक्षक जितेंद्र शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला अंदाजे दीड कोटी रुपये मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता या आरोपात तथ्य नसल्याचे चौकशीत समोर आले असून त्यासंबंधीचा अहवाल पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.
जितेंद्र शिंदे यांना महिन्याला १२ लाख मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर शिंदे यांची बदली डी बी मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. जितेंद्र शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला दीड कोटी रुपये मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच जितेंद्र शिंदेच्या पत्नीच्या नावे एक सिक्युरिटी एजन्सी असून त्यात जितेंद्र शिंदे पैसे गुंतवत असल्याचाही आरोप करण्यात आला होता.
हे ही वाचा:
पुण्यातील १८०० शाळा अंधारात चाचपडत
… तर २४ तासात एसटी कर्मचाऱ्यांना कामातून कमी करणार
ठाण्यानंतर भाईंदरमध्ये फेरीवाले आले अंगावर धावून
लोकसत्ताचे पत्रकार राजेंद्र येवलेकर यांची आत्महत्या
याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू होती. पगाराव्यतिरिक्त कोणतीही रक्कम त्यांच्या खात्यात आढळून आलेली नाही हे चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे जितेंद्र शिंदे हे साल २०१५ पासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. अनेक कार्यक्रमांमध्ये शिंदे हे बच्चन यांचा अंगरक्षक म्हणून वावरतानाचे फोटोही समोर आले आहेत. चित्रपटांच्या शूटिंगपासून केबीसीचा सेट आणि प्रमोशनसाठी जितेंद्र शिंदे हे अमिताभ बच्चन यांच्यासोबत हजर असायचे.