पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे.यावरून नवीन राजकीय वाद सुरु झाला आहे.दरम्यान, पोलिसांनी या आरोपांचा तपास सुरू केला आहे.
कोलकाता पोलिसांच्या मध्य विभागाच्या उपायुक्त (डीसी) इंदिरा मुखर्जी यांनी यासंदर्भात माहिती दिली.त्या म्हणाल्या की, राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस यांच्यावर एका महिलेकडून विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.आमचाही तपास सुरु आहे.पुढील काही दिवसात आम्ही काही संभाव्य साक्षीदारांशी बोलणार आहोत. तसेच सीसीटीव्ही फुटेजची मागणीही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील राजभवनात एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याने पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.याबाबत महिला कर्मचाऱ्याने कोलकाता येथील हेअर स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.राज्यपालांनी दोनदा विनयभंग केला, असा दावा महिलेने केला आहे.
हे ही वाचा:
कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंना धक्का; उपजिल्हाप्रमुखांसह माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
”गरिबांचे आशीर्वाद हेच माझे भांडवल”
सुरक्षेअभावी सिद्धू मूसवालाची हत्या, पंजाब सरकारची सुप्रीम कोर्टात कबुली!
केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना दिलासा; निर्यातीवरील बंदी हटवली
महिलेने आरोप केला की, २४ एप्रिल रोजी राज्यपालांनी राजभवनातील त्यांच्या दालनात तिला तिचा बायोडेटा घेऊन बोलावले आणि तिथे राज्यपालांनी विनयभंग केला.याबाबत महिलेने सर्वप्रथम राजभवन येथील चौकीवर तैनात असलेल्या पोलिसांकडे तक्रार केली. तेथून तिला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात आले.पोलिसांनी या महिलेची ओळख गोपनीय ठेवली आहे.
दरम्यान, राज्यपालांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधत राज्यपाल म्हणाले की, ‘तृणमूल काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि हिंसाचार रोखण्यासाठी जो माझा प्रयत्न आहे त्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही.