हिंदू धर्मातील लोक सहिष्णू आहेत म्हणून आम्ही डोळे बंद करून त्यांच्या सहिष्णुतेची परीक्षा पाहायची का, अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदिपुरुष या चित्रपटाच्या निर्मात्यांवर ताशेरे ओढले.
महावीर हनुमान आणि सीतामाईचे आदिपुरुषच्या निर्मात्यांनी जे चित्रण केले त्यावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांवर संताप व्यक्त केला. या चित्रपटावरून सर्वसामान्य प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली होती. ज्या पद्धतीने या चित्रपटाचे संवाद आणि प्रसंग लिहिले गेले त्याबद्दल उच्च न्यायालयाने सहलेखक मनोज मुंतशीर यांनाही या प्रकरणात आठवड्याभरात आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा:
व्हॅन बिकच्या झंझावातामुळे वेस्ट इंडिजचे वर्ल्डकप खेळण्याच्या आशा बिकट
केसीआर पक्षातल्या ३५ जणांनी धरला काँग्रेसचा हात
निधी सिंगची जागतिक विद्यापीठ गेम्ससाठी निवड
१५ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान भिडणार
अलाहाबाद न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने म्हटले आहे की, या चित्रपटातील संवादांचा विचार करता तो गंभीर विषय आहे. रामायण हे लोकांसाठी अत्यंत आदर्श असे उदाहरण आहे. आपल्या घरातून रामचरितमानस वाचून अनेक लोक बाहेर पडतात. अशा परिस्थितीत सेन्सॉर बोर्डाने आपली जबाबदारी नीट पार पाडली का? चित्रपटातील काही गोष्टींत हस्तक्षेप करण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदिल दाखविण्यापूर्वी कोणती पावले उचलली. अशी गोष्टींवर आपण डोळे मिटून गप्प बसायचे का, कारण हिंदू हे सहिष्णू आहेत म्हणून. ही गोष्ट चांगली आहे की, लोकांनी संतापून कायदा हाती घेतला नाही.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली आहे. पण या सुनावणीला दिग्दर्शक, निर्माते आणि इतर अनुपस्थित असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली. उच्च न्यायालयाने आधीच्या सुनावणीतही चित्रपट निर्मात्यांवर ताशेरे ओढले होते. सेन्सॉर बोर्ड काय करत होते असा सवाल उपस्थित करत न्यायालयाने म्हटले होते की, तुम्ही पुढच्या पिढ्यांना नेमके काय शिकवणार आहात? या चित्रपटातील संवादांवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर ते बदलण्याची तयारी मुंतशीर यांनी दाखविली होती.