27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेष‘मूर्खपणाचे बोलणे बंद करा’!

‘मूर्खपणाचे बोलणे बंद करा’!

खेळपट्टी जाणुनबुजून फिरकीपटूंना अनुकूल केल्याच्या टीकेवरून गावस्कर यांनी सुनावले

Google News Follow

Related

भारताने न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर आता खेळपट्टीवरून विविध टीका सुरू झाल्या आहेत. सामन्याच्या एक दिवस आधी मुंबईतील वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल करण्यात आली, असा दावा काहींनी केला आहे. त्यावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी जोरदार हल्ला चढवला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उपांत्य फेरीच्या पूर्वसंध्येला अखेरच्या क्षणी भारतीय फिरकीपटूंच्या बाजूने बदलण्यात आली, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयने उपांत्य फेरीसाठी भारतीय फिरकीपटूंना अनुकूल अशी खेळपट्टी बनवली, असे वृत्त काही जणांनी दिले. या वृत्तांचा गावस्कर यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
‘जेव्हा भारत कोणत्याही बहुराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचतो, तेव्हा ती नेहमीच अभिमानाची बाब असते आणि जर तो विश्वचषक असेल तर ते अधिक खास आहे.

भारताने हा विजय दिमाखदार शैलीत गाठला आहे. त्यांनी ४००च्या जवळपास धावा केल्या आहेत. ही खूप छान खेळपट्टी आहे. यावर ७००हून अधिक धावा ठोकण्यात आल्या. जे मुरब्बी म्हणतात की, खेळपट्टी भारतीय फिरकीपटूंच्या बाजूने साकारली गेली, त्यांना मला एवढेच म्हणायचे आहे की, मुर्खासारखे बोलणे थांबवा. ही सारी विधाने मूर्खपणाची आहेत. आणि जरी खेळपट्टी बदलली असली तरी ते नाणेफेक करण्याआधी केले गेले, नाणेफेकीनंतर किंवा सामना सुरू झाल्यावर त्यात बदल करण्यात आलेला नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या वाईट कामगिरीनंतर बाबर आझम कर्णधारपदावरून पायउतार

गणपतीपुळे येथे जीवनदान दिलेल्या ‘त्या’ व्हेलच्या पिल्लाचा मृत्यू

शमीने भारताला दाखवला अंतिम फेरीचा मार्ग

जम्मू- काश्मीरमधील सैनिकांसोबत स्थानिक महिलांनी साजरी केली भाऊबीज

‘विश्वचषक स्पर्धेतील एक संघ म्हणून तुम्हाला मैदानावर उतरावे लागते. जी खेळपट्टी आहे, त्यावर खेळावे लागते आणि तुम्हा जिंकावे लागते. भारताने ते करून दाखवले आहे. त्यामुळे खेळपट्टीबद्दल बोलणे थांबवा,’ अशी टीका गावस्कर यांनी केली. उपांत्य सामना संपण्याण्यापूर्वीच अहमदाबादची खेळपट्टी भारताला अनुकूल होईल, अशी चर्चा सुरू आहे, असेही गावस्कर म्हणाले. दुसरा उपांत्य सामनाही झाला नसताना अहमदाबादची खेळपट्टी बदलल्याबद्दल ते आधीच बोलत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

खेळपट्टीत बदल करण्यात आला, मात्र तो स्वतंत्र खेळपट्टी सल्लागार अँडी ऍटकिन्सन यांना विश्वासात घेऊनच करण्यात आला, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)नंतर स्पष्ट केले. अशाप्रकारे नियोजित खेळपट्टीमधील सामान्य आहेत आणि यापूर्वीही दोन वेळा झाले आहेत, असे आयसीसीतर्फे स्पष्ट करण्यात आले. विश्वचषक सामन्यासाठी आयसीसीने दिलेल्या नियमावलीनुसार, यजमान देशाची क्रिकेट संघटना खेळपट्टीची निवड आणि तयारीसाठी जबाबदार असते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा