राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा !

शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम

राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा !

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित सातही दरवाजे उघडले आहेत. मागच्या आठवड्यात सलग पावसामुळे कोल्हापुरात पुर आला होता. आता हा पूर ओसरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आता राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरले असून धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणातून भोगावती नदीत ११,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. पंचगंगा नदी अद्यापही धोका पातळीवर आहे. धरणातून सोडण्यात आलेले पाणी भोगावती नदीमार्गे पंचगंगा नदीला जाऊन मिळते. त्यामुळे आता पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती

पुण्यात २१ लाखांचे मेफेड्रोन जप्त !

उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊदला सात दिवसांची पोलीस कोठडी

इराणमध्ये हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हनीयेह ठार

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात अद्याप पूरस्थिती कायम आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग न झाल्याने शिरोळ तालुक्याला पुराचा फटका बसला आहे.

Exit mobile version