राज्यातील सर्वच रुग्णालयात सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन देखरेख करावी

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

राज्यातील सर्वच रुग्णालयात सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन देखरेख करावी

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही दिवसांपूर्वी रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. त्यासंदर्भातील उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

वाहतूक पोलीस ज्याप्रमाणे सिग्नलवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करत असतात. त्याप्रमाणे राज्यातील सर्वच रुग्णालयाच्या आतमधील परिस्थितीचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात यावी. यातून रुग्णांची परिस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी त्या ठिकाणी रुग्ण कोणत्या अवस्थेत होता. त्याची काय परिस्थिती होती. हे समजण्यास मदत होईल. तसेच त्याला तत्काळ मदत पोहोचवता येईल, असा सल्ला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे.

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कळवा रुग्णालयात घडलेली घटना दुःखद आणि धक्कादायक आहे. परंतु, कोविड काळात आणि कोविडनंतर बऱ्याचशा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येते. यासंदर्भात राज्य शासनाने चौकशी समिती नेमली आहे.

ज्या दिवशी घटना घडली त्यासंदर्भात नागरिकांना काही माहिती काळवायची असेल तर त्यांनी पुढे यावे. यासाठी स्थानिक प्रशासनाने त्यांना त्याबाबत संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून नागरिक प्रशासनासोबत थेट संपर्क साधतील. संपर्क करणाऱ्या नागरिकांची नावे गोपनीय ठेवली जावीत, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, अहंकाराच्या नशेत झिंगून देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत

फोन करत मुख्यमंत्र्यांना केला सॅल्युट; पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई

अंतिम पंघलने पुन्हा जिंकले विश्वविजेतेपद; २० वर्षांखालील किताब सलग दुसऱ्यांदा पटकावला

दत्तक हिंदू मुलांवर धर्मांतरासाठी दबाव, १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने रुग्णालयात आग प्रतिबंधक वस्तूंचा वापर होणे आवश्यक आहे. रुग्णालयात असणाऱ्या इलेक्ट्रिकल्स वस्तूंची वेळोवेळी तपासणी व्हावी असे, नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात, हीच सरकारकडून अपेक्षा असल्याचेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Exit mobile version