मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
“सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलत आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा:
मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान साहित्य मुंबईत दाखल
गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक
अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार
एकनाथ शिंदे यांनी नंतर ठाण्यात येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केलं. यावेळी शेकडो शिंदे समर्थक ठाण्यात उपस्थित होते. ठाण्याचे माजी महापौर आणि माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आज वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांच्या शक्ती स्थळ या समाधीस्थळी उपस्थित राहून विनम्रतापूर्वक अभिवादन केले. #गुरुपौर्णिमा pic.twitter.com/y7TDd2G3Kq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
याप्रसंगी आमदार @SanjayShirsat77, आमदार @miprakashsurve, आमदार सौ.@YaminiYJadhav, आमदार डॉ.@DrKinikarBalaji तसेच माजी नगरसेवक @samadhan234 उपस्थित होते. pic.twitter.com/kI7m2VSCTZ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022