बडतर्फ केलेल्या सर्व केबिन क्रूला पुन्हा घेतले एअर इंडियाच्या ‘विमाना’त

बडतर्फ केलेल्या सर्व केबिन क्रूला पुन्हा घेतले एअर इंडियाच्या ‘विमाना’त

सामूहिक रजेवर गेल्यामुळे बडतर्फ केलेल्या सर्व केबिन क्रूला तत्काळ पुन्हा कामावर घेण्यास एअर इंडिया एक्स्प्रेसने मान्य केले आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता मुख्य कामगार आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत एअर इंडिया एक्सप्रेस व्यवस्थापनाने आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपनीने २५ केबिन क्रू कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणत असल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्याकाही तासांतच व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. हे सर्व कर्मचारी अचानक सामूहिक रजेवर गेले होते. त्यामुळे मंगळवार रात्रीपासून एअर इंडिया एक्स्प्रेसची १००हून उड्डाणे रद्द करण्यात आली.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वरिष्ठ क्रूने कोणतीही पूर्वसूचना न देता एकाच वेळी आजाराचे कारण देऊन सामूहिक घेतल्याने अनेक उड्डाणांना उशीर झाला किंवा ती रद्द करण्यात आली. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले होते. एअरलाइनने नंतर विमानसेवेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले तसेच, प्रवाशांना लोकांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांचे विमान नेमके कोणत्या वेळी येणार आहे, त्याला उशीर होत आहे का, हे तपासण्यास सांगितले.

हे ही वाचा:

‘तुम्ही भारतीय आहात म्हणून तुम्हाला मत दिले नसते’

‘या’ पाच कारणांमुळे सेन्सेक्स गडगडला

हनी ट्रॅप प्रकरण; ‘सोनल’ बनून आयएसआयने लष्करी ड्रोन डेटा मिळवला

त्या जहाजावरील भारतीय सुटले! इराणने पाच भारतीय खलाशांना सोडले

‘आम्ही प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी लवकरात लवकर पोहोचता येईल, हे सुनिश्चित करण्यासाठी, ग्रुप एअरलाइन्ससह, पर्यायी विमानसेवेवरही सामावून घेत आहोत,’ असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे. केबिन क्रूच्या कमतरतेमुळे दैनंदिन एअर इंडिया एक्स्प्रेसच्या नियोजित उड्डाणांपैकी सुमारे २० टक्के उड्डाणांवर परिणाम झाला. गुरुवारी, एअर इंडियाची सुमारे ८५ उड्डाणे रद्द करण्यात आली.

Exit mobile version