मुंबईच्या खड्ड्यांतली ‘मलई’ येत्या दोन वर्षांत बंद

मुंबईतील रस्त्यांची सर्व कामे दाेन वर्षात सुरू करण्यात येतील. तीन वर्षांमध्ये मुंबईमहापालिकेच्या मालकीचे सगळे रस्ते काॅंक्रिटचे केले जातील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं

मुंबईच्या खड्ड्यांतली ‘मलई’ येत्या दोन वर्षांत बंद

मुंबईतील रस्त्यांची सर्व कामे दाेन वर्षात सुरू करण्यात येतील. तीन वर्षांमध्ये मुंबईमहापालिकेच्या मालकीचे सगळे रस्ते काॅंक्रिटचे केले जातील. त्यानंतर हा राेजचा खड्ड्यांचा प्रवास आणि खड्ड्यांचे अर्थकारण पूर्णपणे बंद हाेईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.

मुंबईमध्ये १९०० किलाेमीटरचे रस्ते आहेत. त्यापैकी त्यापैकी १२०० किलाेमीटरचे रस्ते डांबरी आहेत. पुढील दाेन वर्षात १२०० रस्ते काॅंक्रिटचे करता येतील का या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत.त्यातल्या ४०० किलाेमीटरचे काॅंक्रिट राेड करण्याच्या संदर्भातील पहिले टेंडर निघालेलं आहे. आणखी २०० किलाेमीटरचे निघत आहे. पुढच्या वर्षी मार्चमध्ये आणखी ६०० किलाेमीटरचे टेंडर काढण्याचा प्रयत्न  असल्याचंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

‘आता महामार्गावर टोलनाक्यांऐवजी कॅमेरे बसवले जाणार’

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांना ईडीकडून अटक

एरंगल गावातील बेकायदा स्टुडिओ प्रकरणाची होणार सखोल चौकशी

सोनाली फोगाट यांची हत्या झाल्याचा दावा

पात्र संस्थांनाच कामे

कंत्राटदाराने २०० किलाेमीटर्समध्ये लेअर्स टाकलेले नव्हते. मुंबई महापालिकेत स्थानिक कंत्राटदार पात्र व्हायचा पण एल अँड टी पात्र व्हायची नाही. दर्जेदार काम करणाऱ्या एल अँड  टी सारख्या माेठ्या कंपन्यांना पूर्वी पात्र केले नाही. आता असं हाेणार नाही.  त्यांनी ही कामे केली पाहिजेत, असे स्पष्ट करून फडणवीस यांनी पात्र संस्थांनाच रस्त्याची कामे मिळतील याचे संकेत दिले.

कामाला गती देण्याचे निर्देश

२००० काेटींचा भ्रष्टाचार, गुणवत्ता या सगळ्या गाेष्टींकडे आपलं लक्ष आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झालेली असल्याचं सांगून फडणवीस यांनी  रस्त्यांच्या कामांना गती द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्फत पालिका आयुक्तांना निर्देश देण्यात येतील असं स्पष्ट केलं

Exit mobile version