वाढत्या उष्म्यामुळे सध्या एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झालेली आहे. परंतु अन्य प्रवाशांना मात्र गर्दीत घाम गाळत प्रवास करावा लागत आहे. पण आता अन्य प्रवाशांची देखील लवकरच यातुन सुटका होणार आहे. मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी सर्वच लोकल गाड्या वातानुकूलित कारण्याबातच निर्णय मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतच घेण्यात आला होता. आता त्यादृष्टीने पुढचे पाऊल पडण्याची शक्यता आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने ‘एमयूटीपी -३ अ’ प्रकल्पासाठी सात हजार कोटींचे कर्ज उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा वातानुकूलित करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तयारी सुरु केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यास मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेचा चेहरा लवकरच बदललेला बघायला मिळेल.
मुंबईकरांना रोज गारेगार प्रवास करण्याचं अनुभव देण्यासाठी रेल्वे २३८ नव्या रेल्वे गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. या सर्व गाड्या वातानुकूलित असणार आहेत. सध्याच्या लोकल गाडयांचे देखील वातानुकुलित लोकलमध्ये रूपांतर कसे करता येऊ शकेलं यावरही विचार करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे सुखद प्रवासाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. एमयूटीपी-३ ४७ आणि ३ (अ) मधील १९१ अशा २३८ वातानुकूलित लोकल रेल्वेसाठी एमआरव्हीसी लवकरच जागतिक निविदा काढणार आहे.
हे ही वाचा:
‘गो फर्स्ट’ विमान कंपनी दिवाळखोरीत
शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या केरळमधील ‘वंदे भारत’ वर दगडफेक
काँग्रेसची आता बजरंगबलीला बंदिस्त करण्याची तयारी !
सुखकर प्रवास प्रकल्प या योजनेला पंतप्रधान कार्यालयाकडून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने हा २० हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे मंजुरीकरता पाठवण्यात आला आहे. अर्थखात्याकडून मंजुरी मिळताच टेंडर मागवण्यात येणार आहेत. या नवीन वातानुकूलित लोकल गाड्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम तर असतीलच पण त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी टॉकबॅक यंत्रणा आणि सीसीटीव्ही सारख्या काही नवीन वैशिष्ट्यांचा समावेश यात करणार आहे.
मुंबईचे डबेवाले आणि मच्छी विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र डबा असे. मच्छीचा वास पसरू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. विद्यमान लोकलचे एसीमध्ये रूपांतर करण्याच्यादृष्टीने झंभ्यास करून धोरण ठरवण्यात येणार आहे. यासाठी एक कंपनीचं नियुक्ती करण्यात आली असून ही कंपनी सर्वेक्षण करणार आहे. कंपनी डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व सर्वेक्षण अहवाल करणार आहे.