अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकरांची निवड!

७ दशकानंतर प्रथमच मराठी साहित्य संमेलन दिल्लीत

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकरांची निवड!

दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आजच्या (६ ऑक्टोबर) पार पडलेल्या बैठकीत डॉ. तारा भवाळकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत.

२१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये हे संमेलन होणार असून ‘सरहद’ या संस्थेकडून संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संस्थेने २०१४ साली पंजाबमधील घुमान येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. विशेष म्हणजे तब्बल ७ दशकानंतर प्रथमच मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे.

आगामी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी सात ठिकाणाहून प्रस्ताव आले होते. त्यानंतर साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा होऊन आगामी साहित्य संमेलन दिल्लीला घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

हे ही वाचा : 

शिवस्मारकाविरोधात जाणारे काँग्रेस प्रचारक वकील कोण?, हे संभाजी राजेंनी बघावं!

दिल्लीनंतर अमृतसरमध्ये १० कोटी रुपयांचे कोकेन जप्त!

गोवा सरकार ख्रिश्चन समुदायाच्या दबावाखाली ?

‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’च्या संकल्पनासाठी राज्यात ‘सजग रहो’ अभियान!

दरम्यान, दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील यासारख्या ठिकाणीच आयोजित करण्याची माहिती आहे. दरम्यान, ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात आले होते.

Exit mobile version