कुस्ती महासंघाची चहुबाजूंनी नाकाबंदी; सर्व कार्यक्रमांवर बंदी, अतिरिक्त सचिवांना हटवले

बृजभूषण शरण सिंह प्रकरणानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे आदेश

कुस्ती महासंघाची चहुबाजूंनी नाकाबंदी; सर्व कार्यक्रमांवर बंदी, अतिरिक्त सचिवांना हटवले

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यापुढील अडचणी वाढत चालल्या आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आता भारतीय कुस्ती महासंघाच्या कारभारावर लगाम घातला असून महासंघाच्या सगळ्या कार्यक्रमांवर त्वरित बंदी घातली आहे. महिला तसेच पुरुष कुस्तीगीरांनी आंदोलन करत कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण देशभरात गाजत आहे. त्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी तसेच महासंघाचा कारभार सांभाळण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. पण महासंघाच्या सर्व कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे.

आता क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून जी समिती स्थापन करण्यात येईल ती समिती महासंघाचा कारभार हंगामी तत्त्वावर पाहणार आहे.

कुस्ती महासंघाने सध्या सुरू असलेल्या मानांकन स्पर्धा रद्द करावी असेही निर्देश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ही स्पर्धा सुरू आहे. शिवाय, या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची प्रवेश शुक्ल परत करण्याचेही आदेश मंत्रालयाने दिले आहेत.

हे ही वाचा:

घाटकोपरमध्ये दिवसा ढवळ्या साडे नऊ लाखांची घरफोडी

महेश कोठारे यांना पितृशोक अंबर कोठारे यांचे निधन.

पंतप्रधानांच्या सभेत शस्त्रांसह घुसखोरी करण्याचा प्रयत्न

ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावणारे रासबिहारी बोस

क्रीडा मंत्रालयाने आणखी एक आदेश काढला असून त्याअंतर्गत महासंघाचे अतिरिक्त सचिव विनोद तोमर यांनाही निलंबित केले आहे. तोमर यांचा महासंघातील सहभाग हा खेळासाठी नुकसानकारक आहे, असेही मंत्रालयाचे म्हणणे आहे. तोमर यांनी मात्र असे काही घडल्याचे आपल्याला ज्ञात नाही, असे म्हटले आहे.

बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि इतर कुस्तीगीरांना जंतरमंतरवर आंदोलन करत महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह तसेच प्रशिक्षक, पंचांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. महिला खेळाडूंना छळले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. बृजभूषण शरण सिंग यांच्यामार्फत जी वागणूक आपल्याला दिली गेली त्यामुळे आत्महत्येचे विचारही मनात आले, असे विनेश फोगाटने म्हटले होते. भाजपाचे खासदार असलेले बृजभूषण यांनी सर्व आरोप फेटाळले तसेच जर यासंदर्भात पुरावे दिले तर आपण स्वतःला फाशी लावून घेऊ असा इशाराही दिला.

Exit mobile version