ओएनजीसीची जबाबदारी पहिल्यांदा महिलेकडे   

ओएनजीसीची जबाबदारी पहिल्यांदा महिलेकडे   

ओएनजीसीसारख्या महत्त्वाच्या कंपनीची धुरा पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे महिलांचे ऊर्जा क्षेत्रातील स्थान बळकट झाले असून ही अभिमानास्पद बाब आहे. तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशनच्या (ONGC) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अलका मित्तल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महिलांचा प्रत्येक क्षेत्रात वाढणारा दबदबा देशातील तरुणींसाठी अभिमानास्पद आहे.

ओएनजीसीचे पूर्वीचे चेअरमन सुभाष कुमार हे ३१ डिसेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी कंपनीने अलका मित्तल यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. या पदासाठी दोन आयएएस अधिकाऱ्यांसह नऊ उमेदवारांची मुलाखत घेतली होती. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही योग्य वाटले नसल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

हे ही वाचा:

पालिका आयुक्त म्हणतात मुंबईत ‘इतके’ रुग्ण झाले की लॉकडाऊन

या पोलिसांनाही करता येणार ‘वर्क फ्रॉम होम’

डाव्याच नव्हे तर उजव्या एनजीओंचेही परवाने रद्द

मोदींची गाडी, विरोधक अनाडी

कोण आहेत अलका मित्तल?

डॉ. अलका मित्तल यांच्याकडे अर्थशास्त्रातील पदवीत्यूर पदवी, एमबीए(मानव संसाधन), वाणिज्य शाखेतील पदवी आणि बिझनेस स्टडीमधील डॉक्टरेट आहे. अलका मित्तल यांनी १९८५ मध्ये शिकाऊ पदवीधर म्हणून कंपनीत पहिल्यांदा प्रवेश केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्या कंपनीत मानव संसाधन विभागाच्या प्रमुख पदी दाखल झाल्या होत्या. कौशल्य विकास विभागाचे प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

Exit mobile version