23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआलिया -रणबीरच्या घरी, आली लहानगी परी

आलिया -रणबीरच्या घरी, आली लहानगी परी

रिलायन्स रुग्णालयात दिला एका मुलीला जन्म

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील झाले आहेत. कपूर कुटुंबामध्ये एका लहानग्या परीचं आगमन झालं आहे. आलिया भट्टने रविवारी सकाळी मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला आहे . रणबीर कपूर आणि भट्ट कुटुंब या क्षणाची आनंदाची आतुरतेने वाट पाहत होते.

आलिया ६ नोव्हेंबरला सकाळी साडेसात वाजता रणबीरसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये दोघेही त्यांच्या कारमध्ये हॉस्पिटलमध्ये जात असल्याचे दिसले. काही वेळाने सोनी राजदान आणि नीतू कपूरही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.ऑक्टोबर महिन्यात आलिया भट्टीचे बेबी शॉवर फंक्शनही झाले होते.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुलाचा जन्म होणार असल्याची बातमी मीडियामध्ये आली होती. पण ६ नोव्हेंबरला आलियाच्या अचानक हॉस्पिटलमध्ये आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रिपोर्ट्सनुसार आलियासाठी हॉस्पिटलमध्ये आधीच एक रूम बुक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

सोनाली फोगट हत्या प्रकरणात रेस्टॉरंटचा मालक अटकेत

दहशतवादी अबू हंजलाला अटक

‘तर उद्धव ठाकरेंनी महापौर बंगल्याची किंमत सरकारकडे जमा करावी’

श्रीलंकेचा फलंदाज दानुष्काला बलात्काराच्या आरोपात अटक

या बातमीने आलीय आणि रणबीरचे चाहते खूप खूश आहेत. सोशल मीडियावर लोक आलिया आणि रणबीरचे अभिनंदन करत आहेत. महेश भट्ट यांनीही रविवारी सकाळी या गोड बातमीचे संकेत दिले होते.नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याचवर्षी १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले. दोन महिन्यांनंतर आलियाने प्रेग्नेंसीची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट टाकून त्याने चाहत्यांना याची माहिती दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा