आलिया भट म्हणते मी आवडत नसेन तर माझे चित्रपट पाहू नका

ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने आलियाने दिले आव्हान

आलिया भट म्हणते मी आवडत नसेन तर माझे चित्रपट पाहू नका

माझे चित्रपट पाहायचे असतील तर पाहा असे बेदरकारपणे सांगणाऱ्या करिना कपूरचे भूत आता आलिया भट्टच्या मानगुटीवर बसले आहे. ब्रह्मास्त्र या आपल्या आगामी चित्रपटाबाबत तिनेही करिनाच्या पावलावर पाऊल टाकत तुम्हाला जर मी आवडत नसेन तर मला पाहायला येऊ नका. मी यात काहीही करू शकत नाही. मी याबाबत माझा बचाव करू शकत नाही, अशा शब्दांत ट्विट केले आहे.

ब्रह्मास्त्र मध्ये आलियासह तिचा पती आणि अभिनेता रणबीर कपूरही आहे. आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यस्त आहे. त्यादरम्यानच तिने हे वक्तव्य केले आहे. मी जर तुम्हाला आवडत नसेन तर माझे चित्रपट पाहू नका, असे तिने म्हटले आहे.

मिड डेला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केले आहे. याआधी करिनाने असेच वक्तव्य केले होते. आमिर खानच्या लालसिंह चढ्ढा या चित्रपटाविरोधातही सोशल मीडियात मोहिम चालविण्यात आली होती. हा चित्रपट पाहू नका, असेच थेट आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लालसिंह चढ्ढा हा चित्रपट सपशेल आपटला. आता आलिया भटवरही ही वेळ येणार का, असा सवाल विचारला जात आहे.

हे ही वाचा:

म्हणून कर्नाळा किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

१५३५ सालच्या मंदिरातून चोरांनी लांबवल्या पंचधातूंच्या ६ मूर्ती

सायबर गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी ‘हे’ पाऊल उचलणार

कोरोनामुळे आई बाप गेले; ‘या’ विद्यार्थ्यांना सरकार देणार मदतीचा हात

आलिया म्हणते की, लोकांना काहीतरी बोलायचे असते. पण मी माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवेन की मला जी संधी मिळाली आहे त्यासाठी मी पात्र आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रात सुरू असलेल्या या बहिष्काराच्या लाटेसंदर्भात आलिया म्हणते की, हा काय मूर्खपणा चालला आहे? कोणतेही कारण नसताना हे काय चालू आहे?

मागे पीके चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खान म्हणाला होता की, इथे लोकशाही आहे. लोकांना आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर कुणाला फिल्म पाहायची नसेल तर त्याने ती बघू नये. लालसिंह चढ्ढावर लोकांनी घातलेल्या बहिष्कारानंतर करिना व आमिर खान यांनी आमचा चित्रपट पाहायला या अशी भूमिका घेतली होती. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांनीही आम्हाला कोण रोखणार अशी भूमिका घेतली होती पण लोकांनी त्यांच्या दोबारा या चित्रपटाला खरोखरच हजेरीच लावली नाही. हा चित्रपटही फ्लॉप ठरला.

Exit mobile version