28 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेषवायनाड दुर्घटनेवर अमित शहा म्हणाले, 'इशारा देऊन देखील केरळ सरकारचे दुर्लक्ष'

वायनाड दुर्घटनेवर अमित शहा म्हणाले, ‘इशारा देऊन देखील केरळ सरकारचे दुर्लक्ष’

दुर्घटनेपूर्वीच एनडीआरएफच्या ९ टीम केरळात रवाना झाल्या होत्या, अमित शहा

Google News Follow

Related

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (३१ जुलै) केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेबाबत राज्यसभेत भाषण केले. यावेळी अमित शाह यांनी केरळ घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. केरळ सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, अशी आपत्ती येण्याची शक्यता असल्याने केरळ सरकारला आधीच सतर्क करण्यात आले होते. तसेच भविष्यातील धोक्याच्या शक्यतेमुळे केंद्राने एनडीआरएफच्या ९ टीम केरळला पाठवण्यात आल्या होत्या. गृहमंत्री अमित शहा यांनी आरोप केला की, अनेक राज्ये अशा इशाऱ्यांकडे लक्ष देतात, पण केरळ सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, २३ जुलै रोजी केरळ सरकारला भारत सरकारकडून भूस्खलनाचा इशारा देण्यात आला होता. यानंतर २४-२५ जुलैला देखील इशारा देण्यात आला होता. २६ जुलै रोजी त्यांना सांगण्यात आले की, २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, दरड कोसळण्याची शक्यता आहे, मातीही पडू शकते आणि यामध्ये गाडून लोकांचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, राज्याने दुर्लक्ष केले.

हे ही वाचा:

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ५० मीटर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

टेबल टेनिसपटू श्रीजाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय महिला खेळाडू !

यूपीएससीकडून पूजा खेडकरांची उमेदवारी रद्द !

पी. व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनचीही पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

यासोबतच भारताच्या ‘अर्ली वॉर्निंग सिस्टम’बद्दल देखील गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना भारतात अर्ली वॉर्निंग सिस्टम सुरू करण्यात आली होती. यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून २०१६ रोजी या प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यानुसार भारतामधील प्रत्येक राज्याला ७ दिवस अगोदर पूर्व माहिती पाठवली जाते. अनेक राज्यांनी त्याचा वापर केला आहे आणि त्याचे परिणाम देखील पाहिले आहेत. या पूर्व चेतावणी प्रणाली अंतर्गत, २३ रोजी माझ्या आदेशानुसार केरळला एनडीआरएफच्या ९ टीम रवाना झाल्या असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
206,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा