बंगालमध्ये दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त

सूत्रधाराला अटक

बंगालमध्ये दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त

पश्चिम बंगालमध्ये मोठे दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त झाले आहे. पश्चिम बंगालच्या स्पेशल टास्क फोर्सने शनिवारी शहादत नावाच्या एका नवे सीमेपलीकडील दहशतवादी मॉड्युल उद्ध्वस्त केले. पोलिसांनी मॉड्युलच्या मुख्य सूत्रधारालाही अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, हा दहशतवादी मॉड्युल अलकायदाशी संबंधित बांग्लादेशातील प्रतिबंधित संघटना ‘अंसार अल इस्लाम’ च्या सदस्यांशी संबंधित आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, टास्क फोर्सने मॉड्युलचा प्रमुख सूत्रधार मुहम्मद हबीबुल्लाह याला पश्चिम बर्धमान येथील त्याच्या घरातून अटक केली. या गटाचे सदस्य अधिकांश गुप्त संदेशाचा प्लॅटफॉर्म ‘बीआयपी’च्या माध्यमातून संवाद साधत असत.

हे ही वाचा:

NEET पेपर लीक प्रकरणी महाराष्ट्रातून दोन शिक्षकांना घेतलं ताब्यात!

दारू समजून कीटकनाशकाचे सेवन केल्याने अभिनेत्याचा मृत्यू

मागासवर्गीय तरुणानेच लिहिले नाशिकमधील ते पत्रक !

अरविंद केजरीवाल यांचे वजन घटू लागले !

 

भारत आणि बांग्लादेशातील सार्वभौमत्व आणि अखंडतेला नुकसान पोहोचवणारी कृत्ये करण्याच्या उद्देशांसाठी गुप्तपणे ते काम करत होते, अशी माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी भारतीय दंड संहिता आणि यूएपीए कायद्याशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version