23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषअल जझीराचा पत्रकार मोहम्मद वाशाह निघाला हमासचा कमांडर  

अल जझीराचा पत्रकार मोहम्मद वाशाह निघाला हमासचा कमांडर  

Google News Follow

Related

अल जझीराचा पत्रकार मोहम्मद वाशाह हे देखील हमासचे वरिष्ठ कमांडर आहेत, अनेक आठवड्यांपूर्वी मध्य गाझा येथे केलेल्या कारवाईदरम्यान त्याच्या मालकीच्या लॅपटॉपमधून मिळवलेल्या छायाचित्रे आणि कागदपत्रांनुसार स्पष्ट झाले आहे, असा दावा इस्त्रायली लष्कराने केला आहे. अल जझिराच्या पत्रकारावर तो हमासचा कमांडर असल्याचा फोटो सुद्धा शेअर केला आहे.

आयडीएफचे अरबी-भाषेचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल अवचय आद्रे यांनी सांगितले की, अलीकडील काही महिन्यांत अल जझीराच्या प्रसारणात असलेल्या मोहम्मद वाशाह यांच्या लॅपटॉपमधून पुरावे मिळवण्यात आले आहेत.अद्रेई म्हणाले की, उत्तर गाझा पट्टीतील हमासच्या एका छावण्यामध्ये काही आठवड्यांपूर्वी आयडीएफ ऑपरेशन दरम्यान वाशाच्या लॅपटॉपमधून पुरावे जप्त करण्यात आले होते. इस्रायलने दावा केला की पुराव्यांवरून हे दिसून आले की वॉश हा हमासच्या अँटी-टँक मिसाईल युनिटमध्ये प्रसिद्ध कमांडर होता आणि २०२२ च्या उत्तरार्धात त्याने दहशतवादी गटाच्या हवाई युनिटसाठी संशोधन आणि विकासामध्ये काम करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा..

काँग्रेसला गळती; अशोक चव्हाणांनी सोडला काँगेसचा ‘हात’

एलॉन मस्क दहा लाख लोकांना मंगळावर नेणार!

पंतप्रधान मोदींकडून रोजगार मेळाव्यात १ लाख नियुक्ती पत्रांचे वाटप

उत्तर प्रदेशच्या ‘लेडी सिंघम’चं खोट्या लग्नाच्या जाळ्यात

संगणकाच्या तपासणीत मुहम्मद वाशाह नावाच्या व्यक्तीचा हमासमधील काही महत्वाच्या लोकांशी सबंध असलेली छायाचित्रे समोर आली होती. लवकरच पत्रकारितेच्या वेषात असलेल्या इतर दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल आम्ही तपशील उघड करू, असे अद्रेई यांनी ट्विट केले.आयडीएफने ट्विटमध्ये म्हटले आहे कि, अहो अल जझीरा, आम्हाला वाटते तुमच्या पत्रकारांनी परिस्थितीवर निःपक्षपाती अहवाल सादर करायला हवा होता. गेल्या महिन्यात, गाझाच्या रफाह येथे इस्रायली हवाई हल्ल्यात मारले गेलेले दोन अल जझीराचे पत्रकार नंतर आयडीएफने हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद दहशतवादी गटांचे सदस्य असल्याचा आरोप केला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा