25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषअक्षय कुमार दिसणार नव्या अवतारात!

अक्षय कुमार दिसणार नव्या अवतारात!

Google News Follow

Related

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा आता भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारने आज त्याच्या आगामी ‘ओ माय गॉड २’ या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाचे पोस्टर त्याने समाज माध्यमांवर प्रसिद्ध केले आहे. ‘रख विश्वास, तू हे शिव का दास’ असे या पोस्टरवर लिहिलेले दिसत आहे. तर अक्षय कुमार हा देखील भगवान शंकरांप्रमाणे निळ्या रंगात आणि जटाधारी अवस्थेत दिसत आहे. त्यामुळे पहिल्या ओ माय गॉड या चित्रपटात श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा खिलाडी कुमार आता भगवान शंकराची भूमिका साकारणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हा चित्रपट एका महत्त्वाच्या सामाजिक विषयावर भाष्य करणारा आहे असे अक्षय कुमारने म्हटले आहे. या चित्रपटात अक्षयकुमार सोबतच अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता पंकज त्रिपाठी हे देखील दिसणार आहेत. अमित राय यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून केप ऑफ गुड फिल्म, विपुल शहा, राजेश बहल आणि अश्विन वर्दे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हे ही वाचा:

इस्लाम स्वीकारा, नाहीतर देश सोडा… तालिबानचा शीख समुदायाला इशारा!

ICC Men’s T20 WC: आजपासून रंगणार ‘सुपर १२’ चे धुमशान

अमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर

‘अविघ्न पार्क’ अग्नितांडवानंतर पालिकेला जाग; अग्निशमन यंत्रणेचा घेणार आढावा

२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘ओ माय गॉड’ या चित्रपटाचा हा पुढील भाग आहे. ‘ओ माय गॉड’ या चित्रपटात परेश रावल आणि अक्षय कुमार हे दोघे मुख्य भूमिकेत दिसले असून भूकंपामुळे झालेल्या नुकसानासाठी परेश रावल थेट देवावर खटला दाखल करतात अशा घटनेवर संपूर्ण चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेला ‘ओ माय गॉड’ हा चित्रपट खूपच लोकप्रिय ठरला असून आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने तो चित्रपट बघतात. त्यामुळे आता ‘ओ माय गॉड २’ या चित्रपटाकडून प्रदर्शना आधीच मोठ्या अपेक्षा वर्तवल्या जात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा