24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषअक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

Google News Follow

Related

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. यात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या नावाचा समावेश झाला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

“आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. बॅक इन ऍक्शन व्हेरी सून” असे ट्वीट अक्षय कुमारने केले आहे.

हे ही वाचा:

लॉकडाऊन करू नका, सदाभाऊ खोत यांची राज्यपालांना विनंती

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले नियम शिवसेनाच पाळत नाही?

लुटीचा मुद्देमाल जनतेला केला परत

…आणि महाराष्ट्र काँग्रेस पडली तोंडावर

दरम्यान अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर असलेल्या राम-सेतू या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली होती. या चित्रपटात अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक त्याने नुकताच शेअर केला होता. “माझ्यासाठी सर्वात खास चित्रपट बनवण्याचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. राम सेतुचे शुटिंग सुरू! मी चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. माझ्या या लूकवर आपले विचार ऐकायला मला आवडतील…ते माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहेत.” अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा