उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत पोहोचले आहेत. फेब्रुवारीमध्ये लखनऊ उल्लेखनीय आहे की, यूपी सरकार फेब्रुवारीमध्ये लखनऊमध्ये ग्लोबल इन्व्हेंटर्स समिट होत आहे. यानिमित्ताने आदित्यनाथ ५ ते २७ जानेवारी दरम्यान देशातील९ प्रमुख शहरांमध्ये रोड शो आयोजित करणार आहे. रॉड शोच्या आधी आदित्यनाथ यांनी चित्रपट निर्मात्यांची भेट घेणार आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने बुधवारी मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हॉटेल ताजमध्ये भेट घेतली.
यादरम्यान दोघांनी उत्तर प्रदेशातील आगामी फिल्म सिटीबद्दल सखोल चर्चा केली. अक्षय कुमार आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईतील हॉटेल ताजमध्ये भेट झाली. जवळपास ३५ मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली.योगी आदित्यनाथ यांच्या भेटीदरम्यान अक्षय कुमारने त्यांच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांना चित्रपट पाहण्याची विनंती केली.
मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, चित्रपट सामाजिक जागृती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यासोबतच सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा प्रचारही त्यांच्या माध्यमातून केला जातो. आपले सरकार लवकरच नवीन चित्रपट धोरण आणणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. हिंदी चित्रपट उद्योग उत्तर प्रदेश फिल्म सिटीची आतुरतेने वाट पाहत आहे. यामुळे नवीन संधी निर्माण होतील असे अक्षय कुमार यावेळी म्हणाला. अक्षय कुमारसोबत झालेल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर प्रदेशात येण्याचे निमंत्रणही दिले.
हे ही वाचा:
कुलाबा केंद्राने जिंकली बिपीन आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धा
फरफटत नेलेल्या तरुणीबाबत मैत्रिणीने केले विचित्र विधान, चौकशी होणार
उर्फी जावेदची घाणेरडी, विकृत वृत्ती महिला आयोगाला मान्य आहे का?
सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ५ जानेवारीपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून रोड शो सुरू करणार आहेत. यादरम्यान ते देशातील बड्या गुंतवणूकदारांना भेटणार आहेत. या भेटींमध्ये नोएडामधील आगामी फिल्म सिटीच्या संदर्भात प्रमुख चित्रपट व्यक्तिमत्त्वांच्या भेटीचाही समावेश असेल.