बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. अक्षय कुमारकडे यापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व असल्याने अनेकदा नेटकाऱ्यानी त्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेत ट्रोल केले होते. मात्र ,आता त्याला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. याबाबत अक्षयनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर याची माहिती दिली.
भारताचे नागरिकत्व नसताना भारतात राहून बेताल वक्तव्य आणि समर्थन करणाऱ्यांना नेहमी ट्रोल केलं जातं. भारतात आपली भूमिका मांडण्याची सर्वाना मुभा आहे मात्र, देशाचे नागरिकत्व नसल्याने कोणत्याही गोष्टीचे समर्थन करणे अशा लोकांना जड जाते.भारतात राहून ज्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नाही, असे बहुसंख्य लोक आहेत. त्यातीलच बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार हा भारतात राहतो मात्र, त्याच्याकडे भारताचे नागरिकत्व नसून, कॅनडाचे नागरिकत्व आहे.त्यामुळे त्याला अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता मात्र अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन अक्षयनं याबाबत माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
वृत्तवाहिन्यांच्या ‘बेताल’ बातम्यांमुळे तपासावर परिणाम
पुण्यातील गुप्त भेटीवर अजित पवार काय म्हणाले?
मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला
चीन-पाकिस्तानवर नजर ठेवणार भारताचे हेरॉन मार्क २ ड्रोन
२०१९ मध्ये भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून अक्षय कुमारने भारत सरकारकडे अर्ज केला होता. त्यानंतर त्याला तीन वर्षानंतर भारताचे नागरिकत्व मिळाले आहे.अक्षयनं इन्स्टाग्रामवर भारत सरकारकडून पाठवण्यात आलेल्या नागरिकत्व प्रमाणपत्राचा फोटो शेअर करुन भारताचे नागरिकत्व मिळाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अक्षयनं पोस्टमध्ये लिहिलं, “हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!” अक्षयच्या या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अक्षयच्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘ट्रोलर्स की बोलती बंद’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘अक्षय तुझे अभिनंदन’असे लिहिले आहे. भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता लवकरच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार असल्याचे अक्षय कुमारने सांगितले आहे.