अक्षयकुमारच्या चित्रपटाच्या नावात आता ‘भारत’

इंडिया-भारत वादानंतर उचलले पाऊल

अक्षयकुमारच्या चित्रपटाच्या नावात आता ‘भारत’

एकीकडे इंडिया आणि भारत अशी चर्चा सुरू असताना सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या नावात इंडिया ऐवजी भारत या नावाचा समावेश करण्यात आला आहे. अक्षय कुमारचा नवा चित्रपट मिशन राणीगंज : ग्रेट इंडियन रेस्क्यू आता मिशन राणीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू अशा नावाने ओळखला जाणार आहे.    

सध्या भारतात जी २० परिषदेची जय्यत तयारी सुरू आहे. त्या कार्यक्रमाच्या रात्रीच्या भोजनासाठी राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेन्ट ऑफ भारत असे म्हटले आहे. एरवी तिथे प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया असे लिहिलेले असते. यानंतर देशभरात देशाचे नाव कसे बदलले जात आहे, संविधानात कसा बदल केला जाणार आहे, १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या विशेष अधिवेशनात नाव बदलण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येईल अशा एक ना अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. पण असे काहीही नसल्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अक्षयने आपल्या चित्रपटाच्या नावात बदल केला आहे.

हे ही वाचा:

मुंबईत भाजपाकडून ४०० ठिकाणी दहीहंडी उत्सव !

विजयाचे गणितच न समजल्याने अफगाणिस्तानच्या हातून सामना गेला!

आम आदमी पक्षाने पंजाबात इंडी अलायन्सवर घातला घाव

एक कोटीचे इनाम जिंकल्यावर पंजाबच्या जसकरणला अमिताभनी मिठीच मारली! 

हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. राणीगंज येथील कोळशाच्या खाणीवर आधारित हा चित्रपट आहे. या कोळशाच्या खाणीतील कामगारांची सुटका करणाऱ्या जसवंत सिंग गिल यांची ही कथा आहे. पाण्यामुळे भरलेल्या या कोळशाच्या खाणीतून गिल यांनी कामगारांना वाचवले होते. १९८९मध्ये ही घटना घडली होती. या चित्रपटात अक्षयकुमारसह परिणिती चोप्रा, कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, रवी किशन, वरुण बडोला, दिब्येंदू भट्टाचार्य, राजेश शर्मा, वीरेंद्र सक्सेना, शिशिर शर्मा, अनंत महादेवन, सुधीर पांडे, जमील खान आदिंचा समावेश आहे.  

Exit mobile version