‘मी सावरकर’ ही अभिनव वक्तृत्व स्पर्धा घेणाऱ्या आयोजकांमार्फत एका विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अंदमान पर्व’ व्याख्यानमाला असे या व्याख्यानमालेचे नाव असून १४ मे रोजी या व्याख्यानमालेचा प्रारंभ झाला असून २८ मे रोजी समारोप होणार आहे. रविवार १६ मे रोजी सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे व्याख्यान पार पडणारा आहे. संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ही व्याख्यानमाला सुरू होणार असून ‘मी सावरकर’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला श्रोत्यांना ऐकता येणार आहे.
‘मी सावरकर’ ही एक अनोखी वक्तृत्व स्पर्धा गेली चार वर्ष सुरू आहे. ऑनलाइन माध्यमातून ही स्पर्धा होत असून दर वर्षीच स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. याच स्पर्धा समितीतर्फे गेली दोन वर्ष व्याख्यानमालेचेही आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये अनेक सावरकर अभ्यासक आपले विचार प्रकट करत असतात. तर स्पर्धेच्या विजेत्यांनाही आपले विजयी भाषण सादर करण्याची संधी दिली जाते . यावर्षीही १४ तारखेला या व्याख्यानमालेला आरंभ झाला आहे. १४ ते २३ असे सहा दिवस या व्याख्यानमालेत राहुल सोलापूरकर, सुशील अत्रे, अक्षय जोग, उदय माहूरकर, योगेश सोमण, आशुतोष अडोनी हे आपले विचार ठेवतील तर २८ मे रोजी शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाने या व्याख्यानमालेचे सांगता होईल.
हे ही वाचा:
मविआ नेत्यांविरोधात मराठा संघटनेचे जोडे मारो आंदोलन
…आणि केंद्राच्या मदतीमुळे तळोज्यातील ऑक्सिजन प्लँटला मिळाला स्पेअरपार्ट!
ऑक्सिजनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांच्या गठड्या वळल्या
मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना
आज रविवार, १६ मे रोजी सावरकर अभ्यासक,लेखक अक्षय जोग हे ‘सावरकरांची तथाकथित माफीपत्र आक्षेप आणि वास्तव’ या विषयावर आपले विचार मांडतील. तर त्यानंतर ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेतील एक विजेते असणारे मंदार अभ्यंकर हे स्पर्धेतील आपले विजयी भाषण सादर करताना ‘आत्मनिर्भर भारत आणि सावरकर’ या विषयावर बोलतील. https://www.facebook.com/MeSavarkar/ या फेसबुक पेजवर संध्याकाळी ५.३० वाजता ही व्याख्याने श्रोते ऐकू शकणार आहेत.