31 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरविशेषठिसूळ हाडे, ९० फ्रॅक्चर; पण अहमदाबादच्या तरुणाने घेतली आयआयटीत झेप

ठिसूळ हाडे, ९० फ्रॅक्चर; पण अहमदाबादच्या तरुणाने घेतली आयआयटीत झेप

१० हून अधिक शस्त्रक्रिया अक्षतवर करण्यात आल्या

Google News Follow

Related

अहमदाबाद येथील अक्षत शाह हा १७ वर्षांचा तरुण ऑल इंडिया रँक २१ मध्ये आहे आणि तो या वर्षीच्या IIT-JEE मधील अपंग व्यक्ती श्रेणीतील टॉपर्सपैकी एक आहे शिवाय, त्याने IIT गांधीनगर येथे संगणक विज्ञान हा विषय आपल्या डिग्री साठी निवडला आहे. पण यापेक्षाही आणखी एका कारणासाठी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले जाते ते म्हणजे ठिसूळ हाडांचा रोग असताना आणि तब्बल ९० फ्रॅक्चर्स असतानाही त्याने ही कामगिरी करून दाखविली आहे.

 

अक्षतला ठिसूळ हाडांचा रोग आहे. थोड्याशा धक्क्यानेही त्याच्या हाडाला फ्रॅक्चर होऊ शकते. त्याचे पालक सौरीन आणि रोशनी शाह यांनी सांगितले की त्याने आतापर्यंत ९० हून अधिक फ्रॅक्चर सहन केले आहेत आणि त्यासाठी १० हून अधिक शस्त्रक्रिया अक्षतवर करण्यात आल्या आहेत.

 

“मला IIT-JEE मेनमध्ये ९९.०३ पर्सेंटाइल मिळाले होते. JEE ची माझी तयारी इयत्ता ९ वीपासून सुरू झाली होती. गेल्या काही वर्षांत, परीक्षेच्या सर्व विभागांवर लक्ष केंद्रित करून माझी ही सातत्यपूर्ण तयारी चालू होती,” अक्षत सांगतो. अभ्यासाव्यतिरिक्त, त्याला रुबिक्स क्यूब, बुद्धिबळ खेळणे आणि सिंथेसायझर वाजवणे आवडते. त्याच्या स्थितीमुळे, त्याने घराजवळच राहण्याचा आणि उच्चपदस्थ शिक्षण संस्थांमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला होता. अक्षत म्हणाला, “मी लहानपणापासूनच कॉम्प्युटर सायन्सकडे आकर्षित झालो होतो आणि त्यातच करिअर करण्याचा माझा विचार पक्का होता.”

 

 

अक्षतचे वडील सौरीन शाह हार्डवेअर टूल्सच्या व्यवसायात आहेत, तर रोशनी शाह गृहिणी आहेत. अक्षतला त्याची स्वप्ने पूर्ण करता यावीत यासाठी या जोडप्याने आपला सर्व वेळ त्याला दिला. “तो फक्त २७ दिवसांचा असताना आम्हाला त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाली. त्याला दोन फ्रॅक्चर झाले होते आणि कवटीला काही भेगा पडल्या होत्या,” सॉरीन सांगतात. अक्षतला दहावीत ९३ टक्के आणि १२वीत ८० टक्के गुण मिळाले आहेत.

 

हे ही वाचा:

इंडिगोच्या विमानात महिलेचा विनयभंग; प्राध्यापकास अटक

‘नवीन नाव पण तेच चेहरे, तीच पापे’

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा उद्योगरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी

यूएफओ, ‘मानव नसलेली शरीरे’ अमेरिकन सरकारच्या ताब्यात?

 

अनेक धातूचे रॉड्स अक्षतला आधार देतात

 

आई रोशनी म्हणाली की, अक्षतला वारंवार अपघात झालेले आहेत. “छोट्या मारामुळेही त्याच्या हाडांना भेगा पडू शकतात. अनेकदा पडल्यामुळे फ्रॅक्चर होते. त्याला कधी कधी अशक्तपणा जाणवतो आणि आमच्यातील कोणीतरी त्याला त्याच्या दैनंदिन कामात साथ देते. पण तो त्याच्या शरीराच्या स्थितीवर जिद्दीने मात करून वर आला आहे आणि त्याने खूप मोठे शिखर गाठण्याचे ध्येय ठेवले आहे,” रोशनी म्हणाल्या. “आमच्यापैकी कोणीतरी कोचिंग सेंटर्सशी समन्वय साधून याची खात्री करतं की त्याला बसण्याची चांगली व्यवस्था मिळेल ना? आणि तिथे त्याला एखाद्याचा धक्का लागण्याची किंवा तो स्वतः धडपडण्याची कमीतकमी शक्यता कशी ठेवता येईल याची खात्री करतो.”

 

वसना येथील रहिवासी असलेल्या अक्षतच्या हाडांना आधार देण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर हाडांना अनेक रॉड जोडलेले आहेत. त्याच्या या दुर्मिळ अवस्थेमुळे, IIT ने त्याला अपवाद केला आहे आणि त्याला कॅम्पसमध्ये पालकांपैकी एकाकडे राहण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी पालकांनी आधीच परवानगी घेतली आहे. शहर-आधारित वैद्यकीय तज्ञांनी सांगितले की OI ही एक दुर्मिळ स्थिती आहे. हाडांची रचना जास्त वजनाला साथ देत नसल्याने, कोणताही छोटासा ट्रिगर हाडे मोडू शकतो आणि रुग्णांना त्रासदायक वेदना होऊ शकतो. यासाठी नियमित औषधोपचार आणि स्वत: ची काळजी घेण्याचा सल्ला अनेकदा तज्ञ देतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा