अखिलेश यांचा अजब दावा, राम बोलावतील तेव्हाच सोहळ्याला जाईन!

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारण्यास दिला नकार

अखिलेश यांचा अजब दावा, राम बोलावतील तेव्हाच सोहळ्याला जाईन!

२२ जानेवारीला अयोध्येतील राम लल्लाच्या भव्य अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनके नेते निमंत्रणाची वाट पाहत असताना, काही जण सोहळ्याचे निमंत्रण नाकारत आहेत.विश्व हिंदू परिषदेचे नेते आलोक कुमार हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव याना २२ जानेवारीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी आले असता, अखिलेश यादव यांनी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिला.तसेच अखिलेश यादव यांचा विहिंप नेत्यासोबत जोरदार वाद झाला.

आलोक कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, विश्व हिंदू परिषदेने कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी सपा प्रमुखांशी संपर्क साधला होता, परंतु अखिलेश यादव यांनी सांगितले की, ते अनोळखी व्यक्तींकडून निमंत्रण स्वीकारणार नाही.

हे ही वाचा:

बेंगळुरूस्थित सीईओ महिलेने आपल्या मुलाला मारून टाकत आत्महत्येचा केला प्रयत्न

विदेशात नोकरीचे अमिष दाखवून करीत होते फसवणूक

चीनचा तैवानवर क्षेपणास्त्र हल्ला?, तैवान परराष्ट्र मंत्र्यांची पळापळ!

राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला

अखिलेश यांना निमंत्रण देण्याच्या मुद्यावर आलोक कुमार म्हणाले की, ‘आम्ही अखिलेश यांचे पूर्वीचे विधान पहिले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, सोहळ्याला बोलावले तर जाईन.त्यामुळेच त्यांना निमंत्रण पाटण्यात आले होते, पण आता ते सांगत आहे की, जेव्हा प्रभू राम त्यांना बोलावतील तेव्हाच ते सोहळ्याला येथील.आलोक कुमार पूढे म्हणाले की, अशा परिस्थितीत ते आले नाहीत तर स्पष्ट होईल की, प्रभू रामांना देखील नको वाटते की त्यांनी अयोध्येला यावे.

 

Exit mobile version