साहित्य संमेलनाला कोरोनामुळे स्थगिती

साहित्य संमेलनाला कोरोनामुळे स्थगिती

नाशिक येथे होणारे ९४वे साहित्य संमेलन कोरोनाच्या कारणामुळे स्थगिती देण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन २६, २७, २८ मार्च रोजी होणार होते.

हे ही वाचा:

महिला अत्याचार, ट्रोलिंग विरोधात अमृता फडणवीस यांचा व्हिडीओ संदेश

या वेळच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर होते. साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटिल यांनी हा निर्णय जाहिर केला आहे. मात्र पुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन संमेलनाचा विचार केला जाईल असेही ठाले पाटिल यांनी सांगितले आहे.

कोरोनामुळे यावर्षी साहित्य संमेलन होणार नव्हते. परंतु त्यानंतर नोव्हेंबर २०२० पासून कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने पुन्हा एकदा संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा एकदा रुग्णवाढ होऊ लागल्याने संमेलनावर संक्रांत आली आहे. कोरोनाबाबत खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

गेले सलग दोन दिवस महाराष्ट्रात १०,००० पेक्षा अधिक रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा शासनाकडून वारंवार देण्यात येत आहे.

Exit mobile version