भारताने आपली स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली ‘आकाश’ अधिक मजबूत आणि प्रभावी बनवण्यात यश मिळविले आहे.संरक्षण आणि संशोधन संस्था (DRDO) ने शुक्रवारी आकाश-NG या क्षेपणास्त्रच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.सकाळी १०.३० वाजता ओडिशाच्या चांदीपूर किनाऱ्याजवळ असलेल्या एकात्मिक चाचणी श्रेणीवरून ही चाचणी घेण्यात आली.डीआरडीओचे म्हणणे आहे की, या नवीन हवाई क्षेपणास्त्र प्रणालीने उच्च वेगाने उडणाऱ्या मानवविरहित हवाई लक्ष्याला लक्ष्य केलं.
चाचणी दरम्यान क्षेपणास्त्र प्रणालीने हवाई लक्ष्य यशस्वीपणे रोखले आणि नष्ट केले, असे डीआरडीओने सांगितले. आकाश हवाई संरक्षण प्रणाली डीआरडीओद्वारे डिझाईन केली गेली आहे आणि इतर उद्योगांच्या सहकार्याने BEL/BDL ने विकसित केली आहे.देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लष्कर आणि हवाई दलाने ही क्षेपणास्त्र यंत्रणा तैण्यात केली आहे.याशिवाय भारताकडे रशियाची हवाई संरक्षण प्रणाली S-४०० देखील आहे.S-४०० ही जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते.
आकाश-एनजी हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.यामध्ये ड्युअल पल्स सॉलिड रॉकेट मोटर असल्याने याचा वेग अधिक वाढतो. आकाश क्षेपणास्त्रची रेंज ४० ते ८० किमी इतकी आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्कॅन केलेले अॅरे मल्टी-फंक्शन रडार बसवण्यात आले आहे, ज्यामुळे आकाश क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक शत्रूंची क्षेपणास्त्रे किंवा विमाने स्कॅन करू शकते.
हे ही वाचा:
वर्षभरात अयोध्येत ३१ कोटी पर्यटक, प्राणप्रतिष्ठेनंतर महापूर!
‘न्यायालयाचा आदेश सहन करू शकत नाही’… मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठचे पत्र
जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना
स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस…विचारांचा जागर
आकाश-एनजीचे वजन ७२० किलो आहे.त्याची लांबी १९ फूट आणि व्यास १.१६ फूट आहे.हे ६० किलो वजनाची शस्त्रे स्वतःसोबत नेऊ शकते.हे २० किलोमीटर उंचीवर जाऊन शत्रूची विमान किंवा क्षेपणास्त्रे नष्ट करू शकतात.सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचा वेग आहे.यामुळे शत्रूला पळून जाण्याची संधी मिळत नाही.आकाश-एनजी क्षेपणास्त्राचा तशी वेग ३०८७ किलोमीटर इतका आहे.म्हणजे ते एका सेकंदात सुमारे एक किलोमीटर अंतर कापते.
आकाश-एनजी क्षेपणास्त्राची जुनी आवृत्ती २००९ पासून भारतीय लष्कराला सेवा देत आहेत. आकाश-एनजी क्षेपणास्त्राची जुनी आवृत्ती लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गेल्या वर्षी चीनसोबतच्या सीमा विवादादरम्यान तैनात करण्यात आली होती. याशिवाय भारतीय हवाई दलाने ग्वाल्हेर, जलपाईगुडी, तेजपूर, जोरहाट आणि पुणे तळांवर आकाश क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.