27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआकांक्षा - अभिजित अंतिम विजेते

आकांक्षा – अभिजित अंतिम विजेते

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

Google News Follow

Related

द चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अभिजित त्रिपनकरने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या मुंबईच्या राहुल सोलंकीला २५-११, २४-१२ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी अभिजितने संदीप दिवे व प्रशांत मोरे या दोन आजी माजी विश्व् विजेत्यांना पराभूत केले होते. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या अंबिका हरिथला २१-१७, २५-१ असे सहज पराभूत करून आपला विजय निश्चित केला.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या लढतीत मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्याच विकास धारियाला २५-०, २५-१० असे हरविले. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या ऐशा साजिद खानने मुंबईच्या उर्मिला शेंडगेवर २१-१६, २५-११ अशी मात केली.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या फोटोची ट्विटरवर चर्चा

कबड्डीपटू आकाश शिंदे, हरजित कौरचा सन्मान

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू

मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

विजेत्यांना चेंबूर जिमखान्याचे क्रीडा सचिव पी. एम. बाळकृष्ण, संयुक्त क्रीडा सचिव श्री गणेश राय, इनडोअर क्रीडा सचिव बाळकृष्ण परब, तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण केदार, मानद सचिव यतिन ठाकूर व खजिनदार अजित सावंत यांच्या हस्ते रोख पारितोषिके प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा