पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी आजारपणाने निधन झाले आहे. अकाली दलाचे माध्यम सल्लागार जंगबीर सिंह यांनी बादल यांच्या निधनाला दुजोरा दिला आहे. प्रकाश सिंह बादल यांच्या पत्नी सुरिंदर कौर यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा सुखबीर सिंग बादल आणि सून हरसिमरत कौर बादल हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत.

बादल यांना दम्याचा त्रास होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना १६ एप्रिलला मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १८ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. डॉ. दिगंबर बेहरा यांच्या नेतृत्वाखाली अनेक विभागातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र सर्व उपाययोजना करूनही बादल यांना वाचवता आले नाही असे फोर्टिस रुग्णालयाने म्हटले आहे.

प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी पंजाबमधील भटिंडा येथील अबुल खुराना गावात झाला. १९४७ मध्ये गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. बादल यांना प्रशासकीय अधिकारी बनायचे होते, परंतु अकाली नेते ग्यानी करतार सिंह यांच्या प्रभावाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला असे सांगण्यात येते. गेली अनेक दशकांपासून पंजाबच्या राजकारणाचा बादल एक महत्त्वाचा चेहरा होते. शिख समुदायाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिरोमणी अकाली दलाचे ते प्रमुख होते. त्याचवेळी या पक्षाने अनेकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला नेहमीच पाठिंबा दिला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख

प्रकाश सिंह बादल यांच्या निधनाने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. माझा त्यांच्याशी अनेक दशकांपासून जवळचा संबंध होता आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्यासोबत झालेल्या अनेक संभाषणांच्या आठवणी आहेत.प्रकाशसिंग बादल यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते भारतीय राजकारणातील एक महान व्यक्तिमत्व आणि देशासाठी मोठे योगदान देणारे मोठे नेते होते. पंजाबच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि कठीण काळात राज्याला साथ दिली.

 

हे ही वाचा:

डबल-ढोलकीच्या तालावर…

सरकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घातले नाही तर वरिष्ठांना नोटीस

गौतमीचा हल्लागुल्ला अजितदादांचा सल्ला

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू

असा होता राजकीय प्रवास

१९५७ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. १९७० मध्ये तेवयाच्या ४३ व्या वर्षी ते पंजाबचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. एकूण ५ वेळा पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकीकडे पंजाबचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले तर दुसरीकडे २०१७ मध्ये मुख्यमंत्री म्हणून पाचवा कार्यकाळ पूर्ण केला तेव्हा ते ९० वर्षांचे सर्वात वयस्कर मुख्यमंत्री देखील होते.

Exit mobile version