पाकिस्तानला कशाला हवी अमेठीची चिंता?

स्मृती इराणींनी पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांना फटकारले

पाकिस्तानला कशाला हवी अमेठीची चिंता?

पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची स्तुती करणारी एक पोस्ट शेअर केली होती.या पोस्टवरून भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.दरम्यान, राहुल गांधी यांच्या स्तुती करणाऱ्या पोस्टवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील प्रतिक्रिया दिली आहे.स्मृती इराणी पाकिस्तानालाच घेरलं आणि म्हटलं की, अमेठीची चिंता सोडून पाकिस्तानने स्वतःची चिंता करावी.अमेठीमध्ये एक ‘एके-२०३ रायफल’चा कारखाना आहे, ज्याचा वापर सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी केला जातो.एका सभेला संबोधित करताना मंत्री स्मृती इराणी बोलत होत्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी अमेठी सोडून रायबरेली मधून निवडणूक लढवत आहेत.मागच्या वेळी राहुल गांधी त्यांच्या विरोधात अमेठी मधून भाजपच्या स्मृती इराणी उभ्या होत्या.यावेळी काँग्रेसने अमेठीमध्ये केएल शर्मा यांना उभे केले आहे.दरम्यान, एका सभेला संबोधित करताना स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर पाकिस्तानच्या मंत्र्याने केलेल्या टिप्पणीवर निशाणा साधला.त्या म्हणाल्या की, आतापर्यंत मी एका काँग्रेस नेत्याशी लढत होते, पण आता एका पाकिस्तान नेत्याने सांगितले आहे की, स्मृती इराणीचा पराभव केला पाहिजे.चौधरी फवाद हुसेन यांचा उल्लेख करत त्या पुढे म्हणाल्या की, ‘अमेठीची चिंता सोडून पाकिस्तानने स्वतःची चिंता करावी’.

हे ही वाचा:

शरद पवार म्हणतात, उद्धव ठाकरे हे आमच्या विचारांचेच आहेत!

ऍस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून करोना लस मागे घेणार!

मायावतींचे भाचे आता त्यांचे राजकीय उत्तराधिकारी नाहीत!

हमास समर्थक, झाकीर नाईक समर्थक विचारांच्या मुख्याध्यापकांची हकालपट्टी!

त्या पुढे म्हणाल्या की, “जर माझा आवाज पाकिस्तानच्या नेत्यापर्यंत पोहचत असेल, तर मला सांगायचे आहे की, हे अमेठी आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एके-२०३ रायफल्स’ची फॅक्टरी उभारली आहे आणि याचा वापर सीमेवरील पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी केला जातो.त्या पुढे म्हणल्या की, मला आज एक विचारायचे आहे.पाकिस्तान आणि राहुल गांधी यांच्यात काय संबंध आहे?देशात निवडणूक चालू आहे आणि तुम्ही ( राहुल गांधी) त्याचे समर्थन करत आहात, याची निंदा केली नाही.

Exit mobile version