राजस्थानच्या अजमेरमधून धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका मौलवीच्या छळामुळे मुस्लिम पिता-पुत्राने हिंदू धर्म स्वीकारला आहे. धर्मांतरानंतर शरीफ खान हे शुभम अग्रवाल आणि त्यांचा मुलगा अमन खान हा अमन अग्रवाल झाला आहे.
हिंदू धर्म स्वीकारलेले पिता-पुत्र हे खानपुरा अजमेरचे माजी रहिवासी आहेत, जे आता सुभाष नगर अजमेर येथे राहतात. दोघांनी ख्रिश्चन गंज येथील मंदिरात प्रार्थना करून सनातन धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर शुभम अग्रवाल म्हणाले, हिंदू धर्म आणि लोकांच्या प्रभावामुळे मी सनातन धर्म स्वीकारला आहे. इथून पुढे मी दररोज उपासनेसोबतच भक्तिग्रंथांचे वाचन करेन.
ते पुढे म्हणाले, खानपुरा येथील मशिदीच्या मौलवीने माझी पत्नी आणि मुलीला आपल्या बाजूने करून घेतले आणि त्याच्यामुळे माझ्या पत्नीने मला घटस्फोट दिला. मौलवीमुळे माझ्या मुलीने माझ्यावर POCSO केसही दाखल केली. मौलवींनी माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. एवढे सगळे होऊनही मुस्लिम समाजातील एकही व्यक्ती माझ्या मदतीला आला नाही.
हे ही वाचा :
राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पीओकेशिवाय जम्मू- काश्मीर अपूर्ण
गर्दीमुळे स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी पडल्या आजारी, महाकुंभात स्नान तूर्तास नाही!
जम्मूच्या नौशेरामध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट, ६ जवान जखमी!
मी हिंदू धर्माशी पूर्वीपासून जोडलो गेलो असल्यामुळे हिंदू धर्माचे लोक मदत करतात याची मला जाणीव होती. त्यानंतर विचार करून मी सनातन धर्म स्वीकारला, असे शुभम अग्रवाल यांनी म्हटले. माझ्या मुलानेही माझ्यासोबत सनातन धर्म स्वीकारला आहे, तर माझी मुलगी तिच्या आईसोबत आहे. आम्ही दोघे पिता पुत्र सनातन धर्म स्वीकारताना खूप आनंदी आहोत, असे शुभम अग्रवाल यांनी सांगितले.
हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर मंदिराचे पुजारी आनंद पुरोहित यांनी सांगितले की, पिता-पुत्र दोघेही बराच काळ त्रस्त होते आणि दोघांनाही हिंदू धर्म स्वीकारायचा होता. अखेर सोमवारी (१३ जानेवारी) त्यांनी पूजा आणि हवन करून सनातन धर्म स्वीकारला.