अयोध्येतील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांचा मुलगा अजित प्रसाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित प्रसाद यांच्यावर कारमधून अपहरण करणे, मारहाण करणे आणि धमकावल्याचा आरोप आहे. दरम्यान, अजित प्रसाद हे अयोध्येतील मिल्कीपूर जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीची तयारी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित प्रसाद यांच्या विरोधात अयोध्येतील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पलिया रिसाली येथील रहिवासी असणाऱ्या रवी तिवारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अजित प्रसाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर गाडीतून अपहरण करून मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये अजित प्रसाद यांच्यासह राजू यादव, श्रीकांत राय आणि १०-१५ अज्ञात लोकांची नावे आहेत.
हे ही वाचा:
हुजूरपागा मुलींच्या शाळेत “ईद ए मिलाद”ची आवश्यकता काय?
कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, यावेळीही रुळावर ठेवले सिलेंडर!
बेंगळुरूमध्ये महिलेची हत्या करून शरीराचे तुकडे केले
सोने आणि हिऱ्यांच्या तस्करीत तिघांना अटक, ३.१२ कोटींचा माल जप्त!
पैशाच्या व्यवहारांमधून हा वाद झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी अजित प्रसादसह अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल करणात आला असून पोलीस तपासणी करत आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाने अजित प्रसाद यांना मिल्कीपूर मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे, त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरु केली आहे.