राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. यावेळी सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्या काटेवाडी गावाकडे लागले आहे. अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी रविवारी सकाळीच मतदान केले. राज्यातील अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावं, असं सगळ्यांना वाटतं. तसंच आई म्हणून माझ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं,अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली.
लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे. बारामतीमधील जनताही आमच्या सोबत आहेत. आता माझे वय ८६ झाले आहे. लोकांनाही वाटते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखतच दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हीच माझी सुद्धा इच्छा आहे, असे आशाताई पवार म्हणाल्या.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील काटेवाडी गावात आज मतदान पार पडत आहे.अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी गावात जाऊन मतदानाचा हक्क बजावला.त्यानंतर आशाताई पवार यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. लोकांनी भरभरुन प्रेम दिले. त्यामुळे आता ‘दादा’ने मुख्यमंत्री व्हावे, हीच आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप
मोदी सरकारचा मोठा निर्णय; मोफत रेशन योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ
इस्रायलच्या सैन्यांच्या श्वानांचा क्रूर हल्ला; हमासचे दहशतवादी ठार!
आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!
काय म्हणाल्या आशा पवार?
‘मी १९५७ पासून काटेवाडीत मतदान करते आहे. पुर्वीच्या काटेवाडीत आणि आताच्या काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. अनेकांनी यासाठी हातभार लावला आहे. राज्यातील अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावं, असं सगळ्यांना वाटतं. तसंच आई म्हणून माझ्यादेखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं. माझं वय आता ८४ झालं आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मलाही अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं बघायला आवडेल’, अशी इच्छा अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी व्यक्त केली आहे.