अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर शरसंधान करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही स्तुतीसुमने उधळली. त्याचवेळी पाटण्यात मोदींविरोधात एकत्र येणाऱ्या विरोधकांना खडे बोल सुनावले.
अजित पवार म्हणाले की, नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व हा करिश्मा आहे. २०१४ ला मोदींकडे बघून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपा सत्तेवर आले. २०१९ला लोकांना त्यांचा कारभार पटला. त्या वर्षीही ते बहुमताने आले. ते परदेशात गेल्यावर त्यांचे लोक स्वागत करतात. जर देशात त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे?
अजित पवारांनी सांगितले की, आता आम्हाला बैठकांत आमच्या वरिष्ठानी सांगितले की, २०२४ मध्येही मोदीच येणार. पण मी विश्वास देतो की, राष्ट्रवादी पुढे न्यायची आहे चिन्ह, पक्ष आपल्याडेच राहायला हवा. त्याला दृष्ट लागू द्यायची नाही. पक्षाचे २५ वे वर्ष आहे. राष्ट्रीय पक्ष आज राज्याचा पक्ष झाला आहे. राष्ट्रीयत्वाची मान्यता रद्द झाली. ती मिळवायची आहे. मी सांगतो. हे जे काही मदतीने मी केलंय त्यातून २०२४ला होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा ७१ चा आकडा पुढं न्यायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरू. दैवताला विनंती आहे. आशीर्वाद द्या. पांडुरंगाने द्यावा. माझ्यात खोट नाही.
विरोधकांचे कडबोळे घेऊन देश चालत नाही
विरोधी पक्षांवर अजित पवार खवळले. विरोधी पक्षांचे कडबोळे बांधतात. काय झाले पाटण्याच्या सभेत सगळे आले. पण काहीतरी घडले. केजरीवाल यांच्यावरून सगळे फिस्कटले. तिथे फुसका बार निघाला. स्टॅलिन जेवले पण पत्रकार परिषदेला थांबले नाही. असं सगळं कडबोळं घेऊन देश चालत नाही. जनता पक्षाच्या काळात देश नाही चालला. पाच वर्ष काढता आली नाहीत.
हे ही वाचा:
वय झाले, आता थांबा, फक्त आशीर्वाद द्या!
क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?
माजी क्रिकेटर प्रवीण कुमार थोडक्यात बचावला; कारला धडकला ट्रक
समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल
आपण हे करतोय राज्याच्या भल्यासाठी करतोय. राज्याच्या भल्यासाठी निधी येईल, योजना येतील. मंजुरी मिळतील. साखर कारखाने अडचणीत आहेत. ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. मालाला भाव नाही. अल्पसंख्याकांना भडकावण्याचे काम केले जाते. अजित पवार मंत्रिमंडळात असेल तर अडचण येऊ देणार नाही. पण आता त्यांनी (शरद पवार यांनी) आराम करावा. हट्टीपणा करू नये. मी आता थोडंच बोललो सभा व्हायला लागल्या तर वस्तुस्थिती सांगावी लागेल. कुठल्याही घरात अशी स्थिती येऊ नये.