काँग्रेसची ५ मतं अजित पवार गटाने फोडली?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मानले आभार!

शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव

काँग्रेसची ५ मतं अजित पवार गटाने फोडली?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मानले आभार!

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. विधानसभेतील सक्रिय २७४ आमदारांनी गुप्त मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. दरम्यान, महायुतीत असणाऱ्या अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाने काँग्रेसची पाच मतं फोडल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे विजयी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले की, महायुतीचे सर्व निवडून येतील याची खात्री होतीच. आमच्याकडे तशी ४२ मते होती. परंतु त्याच्यापेक्षा अधिक मते मतदारांनी आमच्या दोन्ही उमेदवारांना दिली. यासाठी सर्व आमदारांचे आभार मानतो. हे आमदार ते आमदार फुटतील अशा चर्चा होत्या मात्र आमची मते आम्हालाच मिळतील यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली तशी जबाबदारी सर्वांनी घेतली आणि महायुतीने विजयी ठरली. ही निवडणूक बिनविरोधी होईल अशी आशा होती. मात्र एक उमेदवार वाढल्याने निवडणुकीत याचे रूपांतर झाल्याचे त्यांनी सांगितले.


हे ही वाचा:

श्रेयचोरांचे ‘स्मॉलर व्हर्जन’ म्हणजे रोहित पवार…

महायुतीने आणले मविआच्या नाकी ‘नऊ’

नेपाळमध्ये ‘प्रचंड’ पराभव!

२५ जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित!

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे ९ आणि महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले. तर शेकापच्या जयंत पाटलांचा यामध्ये पराभव झाला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांच्यात आणि जयंत पाटलांच्या शेवट लढत होती. कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र या लढतीत मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळविला आहे. मिलिंद नार्वेकर यांना २४ मते मिळाली आहेत.

Exit mobile version