राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डेंग्यूची लागण झाली आहे.दोन दिवसांपासून सामाजिक कार्यक्रमांत उपस्थित नसल्याने पुन्हा एखदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.मात्र, या चर्चेला प्रफुल्ल पटेल यांनी पूर्ण विराम देत उपमुख्यमंत्री अजित पवार याना डेंग्यूची लागण झाल्याची ट्विट करत दिली माहिती.
राज्यामध्ये डेंग्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे.अजित पवारांची तब्येत अचानक बिघडल्याने चाचणी केली अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.मागील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक कार्यक्रमांत उपस्थित न्हवते.अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे अजित पवार पुन्हा नाराज आहेत का अशी चर्चा रंगू लागली.मात्र या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेलांनी हे ट्वीट केलं आहे.
हे ही वाचा:
इस्रायलने जाहीर केले करा अथवा मरा! हमासविरोधातील लढाई दुसऱ्या टप्प्यांत
गाझामधील रुग्णालयच हमासच्या दहशतवादी कारवायांचे केंद्र
ऑस्ट्रेलियाला नमविण्याची नामी संधी न्यूझीलंडने ५ धावांनी गमावली
कतारमधील आठ भारतीयांना मृत्युदंड देऊ शकत नाही?
प्रफुल्ल पटेल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, अजित पवारांना शनिवारी डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अजित पवार नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. अजित पवार पूर्ण बरे झाले की ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी परततील अजित पवारांवर सध्या घरातच उपचार सुरू आहेत. राज्यात अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या सुरु झाल्या.मराठा आरक्षणवरून काल त्यांचा बारामतीचा दौरा रद्द झाला.
सकल मराठा समाजाच्यावतीने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्यासाठी देखील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. दुपारी एक वाजता अजित पवार माळेगाव साखर कारखान्यातील मोळी पुजनासाठी जाणार होते. मात्र त्यांना गावबंदीचा फटका बसल्याचं दिसत आहे. मराठ्यांचा आक्रोश पाहून अजित पवारांनी बारामती बारामती दौरा रद्द केला असावा किंवा टाळलं असावं अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. बारामतीला जाण्याऐवजी अजित पवार पुण्यात दाखल झाले आहेत.