अजित आगरकर भारताचे नवे राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती प्रमुख

क्रिकेट सल्लागार समितीने केली घोषणा

अजित आगरकर भारताचे नवे राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती प्रमुख

भारताचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. भारताच्या क्रिकेट सल्लागार समितीने ही घोषणा केली. त्यांनी एकमताने आगरकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. जतीन परांजपे, अशोक मल्होत्रा, सुलक्षणा नाईक यांच्या समितीने हा निर्णय घेतला.  

आगरकर यांनी २६ कसोटी, १९१ वनडे आणि ४ टी २० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. वेगवान गोलंदाज म्हणून अजित आगरकर यांनी २००७ला झालेल्या पहिल्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ती स्पर्धा भारत जिंकला होता. वनडे क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतकाचा विक्रम आगरकर यांच्या नावावर आहे. २१ चेंडूत त्यांनी हे अर्धशतक केले होते. वेगवान ५० वनडे विकेट्स घेण्याचाही विक्रम आगरकर यांनी नोंदवला होता. २३ सामन्यात त्यांनी ही कामगिरी केली होती.

हे ही वाचा:

केंद्रीय उत्पादन शुल्कात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांत भारत पेट्रोलियमचा डंका

विश्वासघात करणाऱ्यांनी परवानगीनंतरचं फोटो वापरावेत

अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार

एटीएम फोडणाऱ्या तिघांना अटक  

भारताचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांनी निवड समितीचा राजीनामा दिल्यानंतर ती जागा रिकामी होती. आगरकर यांच्यावर आता ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवड समितीत आता सलील अंकोला हे पश्चिम विभागाचे आणखी एक सदस्य असतील.  

आगरकर यांनी याआधी मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच दिल्ली कॅपिटल संघाचे प्रशिक्षकही ते होते. पुरुष क्रिकेट संघाची निवड समिती अशी- अजित आगरकर (अध्यक्ष), शिव सुन्दर दास, सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ.

Exit mobile version