न्यूझीलंडच्या अजाझ पटेलने नोंदविला १० बळींचा विक्रम

न्यूझीलंडच्या अजाझ पटेलने नोंदविला १० बळींचा विक्रम

अनिल कुंबळेच्या विक्रमाशी केली बरोबरी

अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध दिल्लीतील कसोटीत एकाच डावात १० बळींचा विक्रम केला होता. त्याची पुनरावृत्ती भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत झाली आहे. न्यूझीलंडच्या अजाझ पटेल याने हा १० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. भारतीय संघाच्या १० फलंदाजांना त्याने टिपले. मुंबईत जन्मलेल्या अजाझ पटेलने केलेल्या या कामगिरीमुळे जगभरात त्याची चर्चा सुरू झाली आहे. अजाझने ११९ धावांत हे १० बळी घेतले. याआधी जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनी १० बळींचा विक्रम नोंदविला होता. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५७ धावांत १० बळी (१९५६) तर कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध १९९९मध्ये दिल्लीत ७४ धावांत १० बळींची नोंद केली होती.

मयंका अगरवालव्यतिरिक्त कोणताही भारतीय फलंदाज अजाझच्या फिरकीचा अंदाज बांधू शकला नाही. भारतात अशी कामगिरी करणारा पटेल हा पहिला परदेशी क्रिकेटपटू ठरला आहे.

हे ही वाचा:

डॉ. सच्चिदानंद शेवडेंच्या पुस्तकाचे होणार आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते प्रकाशन

सावरकरांचा अपमान केल्यामुळे फडणवीसांची साहित्य संमेलनाकडे पाठ

‘पेंग्विनवर दिवसाला दीड लाख खर्च; पण लहान बाळासाठी यांना वेळ नाही’

यशवंत जाधव यांच्यावर सोमैय्यांनी फेकला मनी लॉन्ड्रिंग आरोपाचा बॉम्ब

 

अजाझ पटेलने आपला पहिला बळी मिळविला तो शुभमन गिलचा. न्यूझीलंडला यश मिळवून दिल्यानंतर त्याने पुजाराला त्रिफळाचीत करून आपल्या खात्यात आणखी एका विकेटची भर घातली. त्यानंतर त्याने विराट कोहलीलाही शून्यावर टिपून भारताला मोठा धक्का दिला. विराट कोहली पायचीत बाद झाला, त्यावरून वादही निर्माण झाला होता. त्यानंतर श्रेयस अय्यरही पटेलच्या जाळ्यात सापडला. १८ धावा केलेल्या असताना तो बाद झाला. त्यानंतर अजाझने लागोपाठच्या दोन चेंडूंवर वृद्धिमान साहा (२७) आणि अश्विन (०) यांना त्रिफळाचीत करून भारताला दोन हादरे दिले. पण त्याला हॅटट्रिक काही नोंदविता आली नाही. साहाला बाद केल्यावर त्याचे पाच बळी झाले होते. दीडशे धावा करणाऱ्या मयंक अगरवाल याचा अडसरही त्याने दूर केला. त्यानंतर अक्षर पटेलला त्याने टिपले. त्यात अक्षर पटेल नाबाद असल्याचे पंचांनी म्हटले होते पण न्यूझीलंडने रिव्ह्यू घेतला आणि त्यात तो बाद झाला. नंतर जयंत यादव (१२) आणि मोहम्मद सिराज (४) यांनाही त्याने बाद केले.

अजाझ पटेलचा जन्म मुंबईत १९८८ला झालेला आहे. तो आठ वर्षांचा असताना तो कुटुंबियांसह न्यूझीलंडला रवाना झाला. भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे यानेही ट्विट करून पटेलचे अभिनंदन केले आहे. १० विकेट्स घेणाऱ्यांच्या क्लबमध्ये स्वागत असे कुंबळेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Exit mobile version