30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषअजय देवगण, रोहित शेट्टी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग!

अजय देवगण, रोहित शेट्टी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग!

सोशल मीडियावर चर्चा

Google News Follow

Related

अजय देवगण अभिनीत रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. ती केवळ या चित्रपटासाठी नव्हे तर काश्मीरमध्ये केलेल्या शूटिंगमधील व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे. सन २०१९मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर केवळ पाच वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या तीव्र बदलाचा हा आणखी एक पुरावा आहे.

या प्रदेशात शांतता आणि समृद्धी आणण्याच्या उद्देशाने सरकारने अवलंबलेल्या भक्कम उपक्रम आणि धोरणांमुळे दीर्घ विश्रांतीनंतर प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर जम्मू काश्मीरचे सुंदर खोरे बघायला मिळते आहे. खोऱ्यात दहशतवाद येण्यापूर्वी हिंदी चित्रपटांच्या शूटिंगसाठी काश्मीर हे आवडते ठिकाण होते, त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव निर्मात्यांना ही ठिकाणे टाळावी लागली. तथापि, आता ती परिस्थिती बदलली आहे आणि अलीकडच्या काळात तेथे बरेच चित्रपट शूट केले गेले आहेत.

काश्मीरमध्ये उत्तरोत्तर सामान्य स्थिती आणण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत आणि केंद्रशासित प्रदेशात अलीकडच्या वर्षांत हळूहळू बदल होत आहेत, ज्याची सन २०१९पूर्वी कोणी कल्पनाही केली नव्हती. सन २०२४च्या नवीन काश्मीरची प्रतिमा लोकांसमोर येत आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढ, अनेक दशकांनंतर उघडलेले पहिले-वहिले मल्टी-प्लेक्स आणि ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने काश्मीरला दिलेली भेट यामुळे काश्मीर पुन्हा चर्चेत आले आहे. पूर्वी केवळ हिंसाचार, दगडफेक, संप आणि दहशतवादासाठी ओळखले जाणारे ठिकाण आता विकास आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे.

हे ही वाचा:

अग्रवाल कुटुंबीयांनी चालकाचा फोन काढून घेतला, खोलीत डांबून ठेवले, जबाब देण्यासाठी धमकावले आणि….

१३ वर्षांपासून फरार आरोपी नागपुरात साधूच्या वेशात विकत होता जडीबुटी, पोलिसांकडून अटक!

अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास, कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय!

वेंगुर्ला बोट दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले!

काश्मीरमध्ये ३०० चित्रपटांचे शूटिंग
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षांत ३००हून अधिक चित्रपट आणि वेब सीरिजचे शूटिंग झाले आहे. २०२३मध्ये टॉलीवूड आणि बॉलीवूडमधील १०२ वेब सिरीज आणि चित्रपटांना जम्मू आणि काश्मीरमध्ये चित्रीकरणासाठी मान्यता देण्यात आली आहे. यामी गौतमचा ‘आर्टिकल ३७०’, जॉन अब्राहमचा ‘वेद’ आणि शाहरुख खानचा ‘डंकी’ हे काही त्यातील महत्त्वाचे चित्रपट. प्रशासनाने २०२२आधी २०० चित्रपट, वेब सिरीज आणि म्युझिक व्हिडिओंना काश्मीरमध्ये चित्रिकरणाची परवानगी दिली. अधिकाऱ्यांच्या मते, चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करण्यास खोरे प्रभावी ठरले आहे, त्यापैकी अनेकांनी काश्मीरमध्ये चित्रिकरणाची परवानगी देण्याची विनंती केली आहे.

चित्रपट निर्मात्यांमध्ये स्वारस्य वाढवण्याच्या प्रयत्नात जम्मू आणि काश्मीर सरकारने २०२१मध्ये पहिले चित्रपट धोरण सादर केले. शिवाय, २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी, सरकारने जम्मू आणि काश्मीर चित्रपट धोरण २०२१मध्ये नमूद केल्यानुसार सबसिडी वितरीत करण्यासाठी चित्रपट विकास निधीची स्थापना केली. चित्रपट निर्मात्यांना jkfilm.jk.gov.in या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे त्यांचे अर्ज सादर करण्याचा पर्याय आहे. चित्रपट धोरण लागू झाल्यापासून अनेक दिग्दर्शकांनी जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्या चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी अर्ज केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा