ऐश्वर्य-दिव्यांश-रुद्रांक्ष यांनी मिळवून दिले पहिले सुवर्ण; चीनचा विक्रम मोडला

ऐश्वर्य-दिव्यांश-रुद्रांक्ष यांनी मिळवून दिले पहिले सुवर्ण; चीनचा विक्रम मोडला

हांगझोऊमध्ये सुरू असलेल्या १९व्या आशियाई गेम्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी भारतीय नेमबाजांनी केली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल संघातील रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंह पवार आणि ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर यांनी ही सुवर्णकामगिरी केली आहे. ऐश्वर्य-दिव्यांश-रुद्रांक्ष यांनी पात्रता फेरीमध्ये १८९३.७ गुण प्राप्त केले. अशी कामगिरी करून भारतीय संघाने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल संघाने चीनच्या खेळाडूंचा जागतिक विक्रमही मोडला आहे.

चिनी खेळाडूंनी बाकू विश्व चॅम्पियनशिपमध्ये विक्रम केला होता. दक्षिण कोरिया १८९०.१ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला, तर चीनला १८८८.२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या रुद्रांक्षने भारतीय संघासाठी ६३१.६ गुणांची कमाई करून दिली. तर, ऐश्वर्यने ६३१.६ आणि दिव्यांशने ६२९.६ गुण मिळवले.

हे ही वाचा:

संजय राऊत, अंबादास दानवेंच्या बोलण्यावर बंदी घालावी

६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करून लघुग्रहाचा तुकडा घेऊन नासाचे कॅप्सूल पृथ्वीवर

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताने या गटात केवळ सुवर्णपदकाची कमाई केली नाही तर, ऐश्वर्य आणि रुद्रांक्ष १० मीटर एअर रायफल या वैयक्तिक स्पर्धेसाठी पात्र ठरले. दिव्यांशनेही पहिल्या आठ जणांमध्ये स्थान मिळवले होते. मात्र आशियाई गेम्सच्या नियमानुसार, प्रत्येक देशातून केवळ दोन स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकत असल्याने दिव्यांशची ही संधी चुकली. अंतिम फेरीत ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने तिसरे स्थान पटकावून ब्राँझ पदकाची कमाई केली.

Exit mobile version