एयरटेल ५जी सज्ज

एयरटेल ५जी सज्ज

भरती एयरटेलने हैद्राबादमध्ये ५जी नेटवर्कची यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांवरच ५जी ची सुविधा पुरवण्याची क्षमता असणारी एयरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे.

एयरटेलने सध्या उपलब्ध असलेल्या ४जी नेटवर्कवर ५जी नेटवर्कची चाचणी घेतली आहे. यामुळे इंटरनेटच्या वेगाची क्षमता वाढवण्यात एयरटेलला मदत होणार आहे. ५जी नेटवर्कमुळे इंटरनेटचा वेग हा अनेक पटींनी वाढतो. यामुळे ग्राहकांना अनेक सुविधा पुरवणे शक्य होईल. ५जी नेटवर्कमुळे मानवविरहित शस्त्रक्रिया करणे, चालक विरहित गाड्या चालवणे, शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे निर्माण करणे या आणि अशा अनेक गोष्टी करणे शक्य होणार आहे.

जगभरात सध्या चीन आणि दक्षिण कोरिया याच देशांमध्ये ५जी नेटवर्कची सुविधा काही प्रमाणात उपलब्ध आहे. अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांसारख्या प्रगत देशांमध्ये देखील अजून ५जी ची सुविधा उपलब्ध नाही.

भारतामध्ये यापूर्वीच रिलायन्स जिओनेदेखील ५जी सुविधा २०२२ पर्यंत पुरवणार असल्याचे घोषित केले आहे. भारतात एयरटेल आणि जिओ या मोबाइल नेटवर्क सेवा देणाऱ्या प्रमुख कंपन्या आहेत.

एयरटेलने केलेल्या या चाचणीमुळे आता भारतातील दोन्ही प्रमुख मोबाइल कंपन्या ५जी नेटवर्कच्या शर्यतीत उतरल्या आहेत.

Exit mobile version