जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी ध्वजाच्या रंगाचा विमानाच्या आकाराचा फुगा सापडला आहे. सांबा जिल्ह्यातील घागवाल येथे सापडलेल्या फुग्यावर ‘बीएचएन ‘ असे लिहिलेले आहे. पोलिसांनी तो ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. हा फुगा सापडल्यानंतर या भागात खळबळ माजली आहे.
याआधीही १ नोव्हेंबरला अशी बातमी समोर आली होती. त्यावेळी सांबाच्या डोंगराळ भागातील नाडच्या शेतात पाकिस्तानी फुगा आढळल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक लोकांच्या माहितीनंतर पोलिसांनी तो फुगा ताब्यात घेतला होता.हे पाकिस्तानचे नवे काही कारस्थान तर नाहीना असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षीही असे फुगे सापडले होते
पाकिस्तानी फुगे मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षीही अशा घटना समोर आल्या होत्या. गेल्या वर्षी मार्च महिन्यात असे फुगे चार वेळा दिसले होते. त्याचवेळी जुलै महिन्यात मेंढर उपजिल्ह्यातील मानकोट तालुक्यात पाकिस्तानी वायुसेनेचा मॉडेल फुगा सापडल्याने खळबळ उडाली होती.
हे ही वाचा:
आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल
टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू
फुग्यावर पीआयए लिहिले होते
मनकोट तहसीलमधील नियंत्रण रेषेजवळील बलनोई गावातील रहिवासी मोहम्मद शरीफ यांना त्यांच्या शेतात पाकिस्तानी हवाई दलाच्या मॉडेलचा निळा आणि पांढरा रंगाचा फुगा दिसला. फुग्याच्या वरच्या बाजूला पीआयए असे लिहिले होते. माहिती मिळताच पोलिसांनी तो फुगा ताब्यात घेतला .